कसारा मार्गावर मध्यरात्री ब्लॉकमुळे
लोकलसह एक्स्प्रेस गाड्यांना विलंब
सीएसएमटी-कसारा लोकल टिटवाळ्यापर्यंतच
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २२ : मध्य रेल्वेच्या कल्याण-कसारा तिसऱ्या मार्गिकेच्या कामासाठी २४ आणि २५ ऑक्टोबरच्या मध्यरात्री विशेष ब्लॉक घेण्यात येणार आहे. आसनगाव ते आटगावदरम्यान उच्चदाब वीजवाहिन्यांचे टॉवर हटविण्यात येणार असल्याने लोकलसह मेल-एक्स्प्रेस गाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम होणार आहे.
२४ ऑक्टोबर आणि २५ ऑक्टोबरच्या मध्यरात्री २.१० ते पहाटे ३.५५ या वेळेत ब्लॉक घेण्यात येईल. वासिंद ते आटगावदरम्यान हे काम करण्यात येणार आहे. तिसऱ्या मार्गिकेच्या कामात अडथळा ठरणारे ११० केव्ही उच्चदाब वीजवाहिन्यांचे टॉवर हटविण्यात येतील. या ब्लॉकमुळे सीएसएमटीहून रात्री १२.०८ वाजता सुटणारी कसारा लोकल टिटवाळा स्थानकापर्यंतच धावेल. त्यामुळे पुढील स्थानकांवर जाणाऱ्या प्रवाशांची गैरसोय होण्याची शक्यता आहे.
एक्स्प्रेस गाड्यांना उशीर
सीएसएमटी-नागपूर विशेष गाडी खडवली येथे, बलिया-दादर आणि गोरखपूर-दादर एक्स्प्रेस आटगाव येथे, तर शालीमार-एलटीटी एक्स्प्रेस खर्डी येथे थांबविण्यात येतील. या गाड्यांना सुमारे एक तास ५० मिनिटे उशीर होण्याची शक्यता आहे. शालीमार-एलटीटीची आणखी एक गाडी इगतपुरी येथे थांबविण्यात येणार असून, तिला सुमारे एक तास ४५ मिनिटे उशीर होऊ शकतो. हावडा-सीएसएमटी एक्स्प्रेसलाही इगतपुरी येथे थांबविण्यात येणार असून, ती सुमारे एक तास ३५ मिनिटे उशिराने पोहोचण्याची शक्यता आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.