मुंबई

‘एनसीएमसी’च्या घोळात महिला सन्मान योजना

CD

‘एनसीएमसी’च्या घोळात महिला सन्मान योजना
एसटीच्या महसुलावर परिणाम; ५० टक्के महिलांचीच नोंदणी

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता २३ : महिलांना एसटीच्या तिकिटात ५० टक्के सवलत देणाऱ्या महिला सन्मान योजनेला ‘एनसीएमसी’ कार्डच्या घोळाचा फटका बसत आहे. उपलब्ध आकडेवारीनुसार, महिला सन्मान योजनेअंतर्गत ८८ लाख ८१ हजार ५६७ कार्ड सक्रिय (ॲक्टिव्हेशन) झाले असले, तरी एकूण महिला प्रवाशांपैकी केवळ ५० टक्के महिलांचीच नोंदणी झाली आहे. त्यामुळे उर्वरित ५० टक्के महिलांना सवलतीचा लाभ मिळवताना अडचणी येत असल्याचे चित्र आहे.

नोंदणीसाठी अतिरिक्त शुल्क, लांब रांगा आणि कार्ड वितरणातील विलंबामुळे प्रवासी त्रस्त आहेत. पूर्ण तिकीट काढावे लागत असल्याने महिलांनी एसटीकडे पाठ फिरवल्याची चर्चा असून, दररोज सरासरी पाच कोटी रुपयांच्या महसुलावर पाणी सोडावे लागत असल्याचा दावा केला जात आहे. आधीच आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या एसटीसाठी ही परिस्थिती डोकेदुखी ठरत आहे. ‘एनसीएमसी’ नोंदणीतील अडचणींमुळे विभाग नियंत्रकांसह स्थानिक प्रशासनावरही ताण वाढला आहे. सणासुदीत प्रवाशांची गर्दी लक्षात घेता कार्डसक्ती करू नये, अशी मागणी अनेक अधिकाऱ्यांकडून होत असल्याचे समजते, मात्र नोंदणीला मुदतवाढ देण्याचा तूर्तास विचार नसल्याचे परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी स्पष्ट केले. ‘एनसीएमसी नोंदणी आणि वितरणातील अनेक अडचणी आमच्याही निदर्शनास आल्या आहेत. केंद्र शासनाची योजना असल्याने तिची अंमलबजावणी करणे भाग आहे. अडचणी सोडवण्यासाठी आढावा घेऊन अहवाल देण्याचे निर्देश दिले आहेत. तूर्तास तरी नोंदणीसाठी मुदतवाढ देण्याचा विचार नाही,’ असे सरनाईक यांनी सांगितले.


सवलतींचे आकडे काय सांगतात?
एसटीकडून ६५ ते ७५ वर्षे वयोगटातील ज्येष्ठ नागरिकांना ५० टक्के, तर ७५ वर्षांवरील अमृत ज्येष्ठ नागरिकांना महाराष्ट्राच्या हद्दीतील पात्र प्रवासासाठी मोफत सुविधा दिली जाते. विद्यार्थ्यांनाही नियमानुसार सवलती मिळतात, या लाभांसाठी ‘एनसीएमसी’ कार्डची प्रक्रिया सुरळीत होणे आवश्यक आहे.

एकूण कार्ड
ज्येष्ठ नागरिक : १०,८५,८२६
अमृत ज्येष्ठ नागरिक : १४,५०,४२४
महिला सन्मान योजना : ८८,८१,५६७
इतर : १,५८,५०७
एकूण : १,१५,७६,३२४

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra weather cyclone update : बंगालच्या उपसागरात चक्रीवादळाचा भडका; महाराष्ट्रात ऐन दिवाळीत पाऊस खोडा घालणार? हवामान विभागाचा मोठा इशारा!

Data Security : डेटा सुरक्षेत हलगर्जी भोवणार; आस्थापनांवर दंडाची टांगती तलवार; सहकारी बॅंका आणि पतसंस्थांनाही नियमावली लागू

Marathi News Live Updates: नाशिकमध्ये कांद्याने भरलेला पिकअप पलटी, दुचाकीस्वार गंभीर जखमी

IND W vs ZIM W: प्रतिका रावलचं शतक अन् शेफाली वर्माची वादळी खेळी! झिम्बाब्वेला लोळवत भारतीय महिलांचा ९ विकेट्सने दणदणीत विजय

Piyush Goyal : जर्मनीतील भारतीयांनी भारतातील तरुणांच्या कौशल्याला संधी मिळवून देण्यासाठी पुढाकार घ्यावा; केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांचे आवाहन

SCROLL FOR NEXT