मुंबई

आमदार मेहतांसह भाजप नगरसेवकांची पद रद्द करा!

CD

आमदार मेहतांसह भाजप नगरसेवकांचे पद रद्द करा!
परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

भाईंदर, ता.१९ (बातमीदार): मिरा-भाईंदर महापालिकेत नागरिक व पत्रकारांना मारहाण केल्यानंतर महापालिका आयुक्तांच्या घराला रात्रीच्या वेळी घेराव घालणारे आमदार नरेंद्र मेहतांसह भाजपच्या नगरासेवकांचे पद रद्द करण्याची मागणी परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्र्यांसह राज्यपालांकडे केली आहे. यासंदर्भात मेहता यांनी आयुक्तांना पूर्व कल्पना देऊन त्यांची भेट घेण्यात आल्याचे सांगितले.

महापालिकेच्या महासभेच्या कामकाजाचे मोबाईलमधून चित्रीकरण केल्याच्या संशयावरून भाजप नगरसेवकांनी नागरिकांसह पत्रकारांना शुक्रवारी (ता. १६) मारहाण केली होती. त्याच मध्यरात्री आमदार नरेंद्र मेहता व भाजपच्या नगरसेवकांनी कार्यकर्त्यांसह आयुक्त राधाबिनोद शर्मा यांच्या घरी धडक दिली. यावर परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी टीका केली. त्यांनी म्हटले की, ‘आयुक्त त्यांच्या पत्नी आणि दोन चिमुकल्या मुलांसह घरात विश्रांती घेत असताना आमदार नरेंद्र मेहता हे ४० ते ५० नगरसेवक आणि शेकडो उपद्रवी कार्यकर्त्यांचा जमाव घेऊन आयुक्तांच्या निवासस्थानी धडकले आणि संपूर्ण घराला वेढा घातला. त्यांनी ज्या पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते यांच्यावर जीवघेणा हल्ला केला त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करण्यासाठी आयुक्तांवर दबाव आणणे हाच यामागचा उद्देश होता,’ असा आरोप प्रताप सरनाईक यांनी केला आहे. पोलिस आयुक्त स्वतः घटनास्थळी धाव गेल्याने त्यांनी उन्मादी जमावाला शांत केले, या आधीदेखील मेहता व त्यांच्या नगरसेवकांनी अशाच प्रकारे झुंडशाही व गुंडगिरी केल्याचा आरोप सरनाईक यांनी केला.

मेहता यांनी आरोप फेटाळले
आमदार नरेंद्र मेहता यांना विचारले असता पालिका आयुक्तांना रात्री भेटणार असल्याची पूर्व कल्पना देऊन त्यांची भेट घेण्यात आल्याचे सांगितले. या प्रकरणात जे नगरसेवक घटनास्थळी उपस्थित नव्हते त्यांचीही नावे गोवण्यात आली आहेत याची कल्पना आयुक्तांना देण्यात आली. या वेळी पोलिस आयुक्तदेखील उपस्थित होते, असा खुलासा मेहता यांनी केला.

---------------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gokul Election Result 2026 : तब्बल तीन तासांच्या राजकीय गोंधळानंतर गोकुळचा निकाल जाहीर, सतेज पाटील गोकुळचे किंगमेकर

CJP च्या नेत्यांच्या अडचणीत वाढ; जंतरमंतर आंदोलन प्रकरणी आशुतोष रांका आणि सौरव दास यांना न्यायालयीन धक्का!

Tiger Shroff Firing Case : टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणातील आरोपींना पकडणाऱ्या कोण आहेत आयपीएस तेजस्विनी गौतम?

Latest Marathi News Update : राज्यासह देशभरात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

Daler Mehndi: 'मद्य पिऊन गाऊ नका..!' उत्तराखंडच्या मंत्र्यांनी दलेर मेहंदी यांना मंचावरच विचारला जाब

SCROLL FOR NEXT