मुंबई

महामार्गलगतची झाडे जळून खाक

CD

खारघर, ता. ११ (बातमीदार) : कोपरा खाडी ते खारघर टोल नाका महामार्गालगत पदपथावर रात्रीच्या वेळी बेकायदा व्यवसाय केले जात आहेत. अशातच मंगळवारी रात्री या मार्गालगतची झाडे जळून खाक झाली आहेत. त्यामुळे फेरीवाल्यांनीच ही आग लावल्याचा संशय व्यक्त केला जात असून त्यांच्यावर कारवाईची मागणी होत आहे.
सायन-पनवेल महामार्गालगत सीबीडीकडून पनवेलकडे जाताना आणि पनवेलकडून सीबीडीकडे येताना कोपरा खाडी आणि खारघर टोल नाकादरम्यान पदपथावर दिवसा हेल्मेट, तर रात्रीच्या वेळी अंडाभुर्जीचा व्यवसाय करणाऱ्यांनी दुकाने थाटली आहेत. अशातच कोपरा खाडीकडून टोल नाक्याकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कडेला खाडी किनाऱ्यालगतची तीस ते चाळीस झाडे मंगळवारी रात्री लागलेल्या आगीत जळून खाक झाली आहेत. या प्रकारामुळे पर्यावरण प्रेमींकडून रस्त्यालगतच्या बेकायदा व्यवसायांवर कारवाईची मागणी होत आहे.
दरम्यान, याविषयी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांकडे विचारणा केली असता खारघर वाहतूक पोलिसांना माहिती देऊन अशा फेरीवाल्यांवर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती देण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

बावनकुळेंपासून वडेट्टीवारांपर्यंत! नागपूर पदवीधरसाठी १४ आमदारांसह दोन खासदारांना मतदानच करता येणार नाही, धक्कदायक कारण समोर...

आजारी पडल्यावर सोनाली बेंद्रे खाते सीकेपी पद्धतीचा हा खास पदार्थ; शुटिंगमुळे दमल्यावर हॉटेलवाल्यांनाही लावते कामाला

Teachers Mobile Ban: गुरूजींनी मोबाईलला म्हटले ‘बाय बाय’! सकाळी १० ते ४ फोन मुख्याध्यापकांकडे; अहिल्यानगरचा प्रयोग चर्चेत, रिल्स आणि गॉसिपला ब्रेक

भुवनेश्वर कुमारची टीम इंडियात वापसी कशी झाली? Ajit Agarkar च्या जाण्याने खुला झाला मार्ग, कोणी भाकरी फिरवली?

Repo Rate Hike: 44 महिन्यांनंतर RBIचा मोठा निर्णय! रेपो रेट वाढला; कर्ज आणि EMI किती महागणार? FD करणाऱ्यांना काय फायदा?

SCROLL FOR NEXT