मुंबई

पतधोरणाचे उद्योजकांकडून स्वागत

CD

मुंबई, ता. ८ ः व्याजदरवाढीमुळे परवडणाऱ्या घरांच्या क्षेत्रावर परिणाम होईल, मात्र नाणी देणारी यंत्रे व परदेशी प्रवाशांना यूपीआय पेमेंटची सुविधा यामुळे इज ऑफ लिव्हींग साधले जाईल अशी प्रतिक्रिया उद्योग क्षेत्रातून व्यक्त होत आहे. अर्थव्यवस्थेच्या वाढीची पुष्टी करत आज रिझर्व बँकेने येत्या वर्षात जीडीपी वाढीचा वेग ६.४ टक्के असेल हे सांगितले आहे.

भांडवली खर्चातील वाढ, नागरी आणि ग्रामीण भागातील वाढता खप, मोठ्या प्रमाणावर होत असलेली नोकरभरती आणि गुंतवणूक यातून भारतीय अर्थव्यवस्था वाढीला लागत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे भारतात परकीय गुंतवणुक वाढून त्याचा फायदा आपल्याला होईल. तर गृहकर्जांच्या व्याजदर वाढीचा मोठा फटका परवडणाऱ्या घरांच्या क्षेत्राला बसण्याची शक्यता आहे, अशी भीती ‘नरेडको’चे राष्ट्रीय उपाध्यक्ष निरंजन हिरानंदानी राष्ट्रीय उपाध्यक्ष यांनी व्यक्त केली.

आज रिझर्व बँकेने केलेली रेपोदरवाढ ही अपेक्षेनुसारच होती. बँकांची कर्जे वाढत असल्यामुळे देशात रोखतरलता भरपूर आहे. तसेच अजुनही सहा टक्क्यांच्या आसपास असलेली चलनवाढ कमी करण्यावर रिझर्व बँकेचा भर असल्याने हा निर्णय घेण्यात आला. देशात नाणी देणारी यंत्रे लावणे तसेच जी २० देशांमधून येणाऱ्या परदेशी प्रवाशांना यूपीआय पेमेंटची सुविधा उपलब्ध करणे यामुळे ईझ ऑफ लिव्हींगला चालना मिळेल, असे आयएमसी चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष अनंत सिंघानिया म्हणाले.

अॅपच्या यादीवरून कारवाई
नुकतीच रिझर्व बँकेने त्यांच्याकडे नोंदणीकृत असलेल्या बिगर बँक वित्तसंस्थांबरोबर काम करणाऱ्या कर्ज देणाऱ्या ॲपची यादी केंद्र सरकारला दिली होती. त्याआधारे नुकतीच इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी तंत्रज्ञान मंत्रालयाने अशा ९४ लोन ॲपवर बंदी घातल्याची माहिती गव्हर्नर शक्तिकांता दास यांनी आज येथे दिली. त्यातील काही ॲपतर्फे चुकीच्या पद्धतीने कर्ज दिली जात होती. त्यांच्या अटी शर्ती अवाच्या सव्वा होत्या. त्या कारणाने कर्ज घेणाऱ्यांसाठी एक सापळा तयार होत असे, त्यामुळे ही कारवाई करण्यात आली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs NZ Final Live Telecast: आज ठरणार विश्वविजेता! सामना किती वाजता आणि फ्री लाईव्ह कुठे पाहायचा? वाचा पूर्ण डिटेल्स

Latest Marathi News Live Update : वकील महिलेला न्यायालय परिसरात मारहाण

Operation Sindoor Book Review : भारतीय संरक्षण दलांची अभूतपूर्व शौर्यगाथा

New Marathi Book : ‘तर्कतीर्थां’च्या व्यक्तिमत्त्वाचा समग्र धांडोळा

The Roses Movie Review : प्रेमाच्या गुलाबाबरोबर काट्याची नर्मविनोदी कथा

SCROLL FOR NEXT