मुंबई

दहिसर गावचा पाणी योजनेला आक्षेप

CD

मनोर, ता. १८ (बातमीदार) : जलजीवन मिशन योजनेअंतर्गत दहिसरतर्फे मनोर गावासाठी मंजूर असलेल्या पाणीपुरवठा योजनेच्या कामाला ग्रामस्थांनी आक्षेप घेतला आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रकाश निकम यांच्या पुढाकाराने दहिसर तर्फे मनोर गावात आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. ग्रामपंचायतीच्या सभागृहात पार पडलेल्या बैठकीत अध्यक्ष प्रकाश निकम यांनी ग्रामस्थ आणि ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांकडून पाणीपुरवठा योजनेबाबतचे आक्षेप जाणून घेतले. ग्रामस्थ आणि ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांच्या मागणीनुसार सुधारित अंदाजपत्रक तयार करून पाणीपुरवठा योजना राबवण्याचे आदेश दिले.
आढावा बैठकीत पाणीपुरवठा विभागाच्या अभियंत्यांनी योजनेची सविस्तर माहिती दिल्यानंतर योजनेचा आढावा घेण्यात आला. दहिसर गावासाठी मंजूर असलेल्या पाणीपुरवठा योजनेचे पंधरा वर्षांचे नियोजन करण्यात आले होते. पाणी साठवण टाकी आणि वितरण व्यवस्थेतील जलवाहिन्यांचा आकार छोटा असल्याचा आक्षेप नोंदवण्यात आला गावाचा विस्तार पाहता दोन साठवण टाक्या, गावाच्या चारही दिशांना वस्ती असलेल्या ठिकाणी जलवाहिन्या टाकणे आणि तीस वर्षांचे नियोजन करून सुधारित अंदाजपत्रक तयार करून योजना राबवण्याची मागणी करण्यात आली. मंजूर असलेली पाणीपुरवठा योजना ग्रामपंचायत पदाधिकारी आणि ग्रामस्थांना मंजूर नसल्याने शाखा अभियंत्यांमार्फत गावाची पाहणी करून नवीन अंदाजपत्रक तयार करण्याचे आदेश प्रकाश निकम यांनी पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता निवडंगे यांना देण्यात आले.
बैठकीला जिल्हा परिषद सदस्या विनया पाटील, दहिसरच्या सरपंच अंकिता भोईर, उपसरपंच उल्हास ठाकूर, ग्रामपंचायत सदस्य, जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता गंगाधर निवडंगे, उपविभागीय अभियंता प्रदीप कुलकर्णी, शाखा अभियंता आणि ग्रामस्थ उपस्थित होते.


-------------------
आयुर्वेदिक दवाखान्याचा विस्तार करण्‍याचे आदेश
प्रकाश निकम यांनी दहिसर तर्फे मनोर गावातील जिल्हा परिषदेच्या आयुर्वेदिक दवाखान्याला भेट देत इमारतीची पाहणी केली. शंभर वर्षे जुनी इमारत असल्याने इमारतीची दुरावस्था झाल्याचे दिसून आले. दवाखान्याच्या इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट करून इमारत दुरुस्ती आणि रुग्णांच्या सोयीसाठी इमारतीचा विस्तार करण्याचे आदेश आरोग्य विभागाच्या अभियंत्यांना दिले. ग्रामीण भागात असलेल्या दवाखान्यात दिवसाला चाळीस ते पन्नास रुग्णांवर उपचार केले जात असल्याने वैद्यकीय अधिकाऱ्यांचे कामकाज आणि रुग्ण सेवेवर समाधान व्यक्त केले. या वेळी जिल्हा परिषद सदस्या विनया पाटील आणि तालुका आरोग्य अधिकारी डॉ. तन्वीर शेख उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: सोनं आणखी स्वस्त! MCX बाजारातही मोठी घसरण; पाहा आजचा ताजा भाव

Kolhapur Rickshaw Driver : कोल्हापुरात रिक्षा स्टॉपच्या माजी अध्यक्षाचा दगडाने ठेचून निर्घृण खून; हनुमान मित्रमंडळाच्या खोलीमागे आढळला नग्नावस्थेत मृतदेह

Stock Market Today: युद्धाचा धक्का! सेन्सेक्स 2300 अंकांनी घसरला, कोणत्या सेक्टरला मोठा फटका?

Israel Iran War Update : इराण-इस्रायल युद्ध थांबणार ? डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा खुलासा; नेतन्याहूसोबत घेणार परस्पर निर्णय

Divakar Game Arrest Wardha POCSO Case : 78 वर्षीय नेत्याचा अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; राष्ट्रवादी पक्ष कारवाई करणार का?

SCROLL FOR NEXT