मुंबई

मुरबाडमध्ये १७ जागांसाठी ३९ उमेदवार रिंगणात

CD

मुरबाड, ता. २२ (बातमीदार) : तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक अत्यंत चुरशीची होणार असल्याची चिन्हे दिसत आहेत. मागील निवडणुकीत संचालक मंडळावर माजी आमदार गोटीराम पवार यांच्या समर्थकांनी बहुमत मिळवले होते. त्यांना टक्कर देण्यासाठी विद्यमान आमदार किसन कथोरे यांचे समर्थकांनी अर्ज दाखल केले आहेत. त्यामुळे बाजार समितीच्या निवडणुकीत या दोन्ही पक्षांत जोरदार चुरस होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत १७ जागांसाठी ३९ उमेदवार रिंगणात आहेत. या निवडणुकीसाठी एकूण १०८ अर्ज दाखल झाले होते. त्यापैकी ६८ उमेदवारांनी अर्ज मागे घेतले. हमाल व तोलाई या गटात दोनपैकी एका उमेदवाराने माघार घेतल्याने जयराम देसले बिनविरोध निवडून आले आहेत. कृषी, पत व बहुउद्देशीय संस्था प्रतिनिधी मतदारसंघ एकूण जागा ११ आहेत. त्यामधील सर्वसाधारण सात जागांसाठी १६ उमेदवारी अर्ज व ग्रामपंचायत मतदारसंघातील सर्वसाधारण दोन जागांसाठी सात अर्ज उरले आहेत. उर्वरित सर्व आठ जागांसाठी सरळ लढत होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran War Ceasefire Talks : मोठी बातमी ! इराण युद्धबंदीच्या चर्चेसाठी तयार पण... डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितला नेमका अडथळा काय?

Viral Video: आधी आई-वडील गेले, मग पतीही गेला… माझ्या मुलाची काळजी घ्या... ; आईने व्हिडिओत रडत सांगितलं अन् संपवलं जीवन

Ladki Bahin Yojana Update : लाडक्या बहि‍णींसाठी आनंदाची बातमी! फेब्रुवारी अन् मार्चचा हप्ता एकाच वेळी मिळणार, तारीखही आली समोर...

Hadapsar Station: हडपसर स्थानकात चौथ्या फलाटाला मंजुरी; प्रवाशांची सोय, विस्तार झाल्याने रेल्वे गाड्यांची संख्या वाढणार

Heart & Kidney Disease Detection Tool: मधुमेहामुळे हार्ट आणि किडनीवर येणारा ताण आता आधीच ओळखता येणार; डॉक्टरांसाठी नवीन स्मार्ट टूल लाँच!

SCROLL FOR NEXT