मुंबई

मरिन ड्राईव्हवर सर्वोत्तम सुविधा द्या

CD

सकाळ वृत्तसेवा

मुंबई, ता. १ ः मरिन ड्राईव्ह परिसरात देश-विदेशांतून येणारे पर्यटक आणि मुंबईकर नागरिकांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. येथील विविध सुविधा, स्वच्छता व सुशोभीकरण कामांचा आढावा घेणारा पाहणी दौरा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी केला. या परिसरात पालिकेच्या माध्यमातून करण्यात येत असलेल्या कामांची, तसेच उपाययोजनांची माहिती महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी मुख्यमंत्री शिंदे यांना दिली. मुख्यमंत्र्यांनी आज कोस्टल रोडचीही पाहणी करून कामाचा आढावा घेतला.
मुंबई महानगरात जगभरातून पर्यटक येतात. खासकरून मरिन ड्राईव्ह परिसराला सर्वच पर्यटक हमखास भेट देतात. या पर्यटकांना तसेच या परिसरात विरंगुळा म्हणून भेट देणाऱ्या मुंबईकर नागरिकांना आंतरराष्ट्रीय दर्जाच्या निरनिराळ्या सोयी-सुविधा देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महापालिका प्रशासनाला आदेश दिले. मरिन ड्राईव्ह परिसरातील सी-फेसिंग इमारतींना विशिष्ट रंग देण्यात यावा. तसेच आंतरराष्ट्रीय दर्जाचा लेझर-शो या ठिकाणी सुरू करावा, असे सांगून सध्या सुरू असलेल्या सुशोभीकरण कामांच्या आणि स्वच्छतेच्या अनुषंगानेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विविध सूचना केल्या. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, महिला बालविकास आणि पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा, अतिरिक्त आयुक्त आशीष शर्मा आदी या वेळी उपस्थित होते. कोस्टल रोडचे काम वेगात सुरू आहे. त्या कामाचाही मुख्यमंत्री शिंदे यांनी आढावा घेतला. या वेळी पालिका आयुक्त इक्बाल सिंह त्यांच्यासमवेत होते. सार्वजनिक प्रसाधनगृहांची सुविधा उपलब्ध करून देण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी पालिका प्रशासनाला दिले.
...
व्ह्युविंग डेकची उभारणी
पालिका आयुक्त चहल यावेळी म्हणाले की, मरिन ड्राईव्हवर पर्यटनाच्या अनुषंगाने एक व्ह्युव्हिंग डेक (सी साईड प्लाझा) तयार करण्यात येत आहे. व्ह्युव्हिंग डेक निर्मिती ही नियोजन विभागाकडून केली जाणार आहे. एकूण ५३ मीटर लांब व ५ मीटर रुंद असा सी साईड प्लाझा नागरिकांना चालण्यासाठी, तसेच समुद्र पाहण्यासाठी जेट्टीच्या ठिकाणी तयार करण्यात येणार आहे, असे त्यांनी नमूद केले. मरिन ड्राईव्ह परिसरात समुद्राच्या दिशेने (सी फेस) आसन व्यवस्था येत्या काही दिवसांत करण्यात येईल. त्यामुळे पर्यटकांना समुद्र पाहण्यासाठी चांगली, सुखकर जागा मिळेल. त्या दृष्टीने कामाला सुरुवात करण्यात येत आहे, असेही आयुक्त चहल यांनी नमूद केले.
...
एक किलोमीटर अंतरावर प्रसाधनगृह
मरिन ड्राईव्ह परिसरात येणारे नागरिक आणि पर्यटकांच्या सुविधेसाठी प्रत्येक एक किलोमीटर अंतरावर उत्कृष्ट दर्जाचे प्रसाधनगृह उभारण्यात यावे, असेही निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. त्यावर खासगी कंपन्यांच्या सामाजिक दायित्व सहभागाने (सीएसआर) दोन प्रसाधनगृहे उभारण्यात येतील, याबाबतचे कार्यादेश लवकरच देण्यात येतील, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त आशीष शर्मा यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sangli Crime : हमाल नेत्याच्या नातवाचा गोळ्या घालून खून; रेल्वे मालधक्का ठेक्याच्या वादातून कुख्यात गुंडाचे कृत्य

Congress NCP Merger: काँग्रेसकडून शरद पवारांच्या राष्ट्रवादीला विलीनीकरणाचा प्रस्ताव?, तीन आमदार भाजपच्या वाटेवर?

Walchandnagar News : लासुर्णेच्या पृथ्वीराज मुळीक याचे सैन्यदलात भरतीचे स्वप्न साकार; लेफ्टनंटपदाच्या प्रशिक्षणासाठी झाली निवड

RBI च्या निर्णयाचा परिणाम! SBI आणि बँक ऑफ बडोदाकडून व्याजदरात वाढ; पण कोणत्या आणि किती?

गिग वर्कर्ससाठी मोठी खुशखबर! नवीन e-Shram पोर्टल झालं सुरू; २१ जूनपर्यंतच करता येणार नोंदणी, पाहा स्टेप बाय स्टेप प्रोसेस

SCROLL FOR NEXT