मुंबई

गणेश उत्सवापूर्वी विर्सजन घाटाचे काम पूर्ण करा : सरनाईक

CD

ठाणे, ता. १७ : घोडबंदर रोडवरील बाळासाहेब ठाकरे चौपाटी टप्पा क्रमांक २ वर विसर्जन घाट आणि दशक्रिया विधी घाटाचे काम गणेशोत्सवापूर्वीच पूर्ण करा, अशा सूचना आमदार प्रताप सरनाईक यांनी ठाणे महापालिका अधिकाऱ्यांना केल्या आहेत. मंगळवारी आमदार आणि महापालिका अधिकाऱ्यांनी त्या चौपाटीचा पाहणी दौरा केला. यावेळी येथील लँडस्केपिंग गार्डन, पाथवे, सायकल ट्रॅक, जॉगिंग ट्रॅक ही सर्व कामे लवकरात लवकर पूर्ण करावीत, पण गणेशोत्सवापूर्वी विर्सजन घाट व दशक्रिया विधी घाट पूर्ण झाला नाही तर सत्ताधारी पक्षाचा आमदार असूनही मला लोकांच्या हितासाठी आंदोलनाशिवाय पर्याय राहणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला. आमदार प्रताप सरनाईक यांना मंगळवारच्या पाहणी दौऱ्यात कासारवडवली, भाईंदरपाडा, ओवळा येथील नागरिकांनी भेटून विसर्जन घाट व दशक्रिया विधी घाट लवकरात लवकर पूर्ण करून देण्याची मागणी केली. यावेळी महापालिकेचे अधिकारी मोहन कलाल यांच्यासह, माजी नगरसेविका साधना जोशी, विद्युत विभागाचे रोकडे, वाहतूक पोलिस निरीक्षक संदीप सावंत, तसेच मेरिटाईम बोर्डाचे अधिकारी उपस्थित होते. गेल्या अनेक वर्षांपासून मेरिटाईम बोर्ड व ठाणे महापालिकेच्या माध्यमातून गायमुख येथील स्व. बाळासाहेब ठाकरे चौपाटीचा टप्पा क्रं. १ नागरिकांसाठी खुला करण्यात आला आहे. या चौपाटीचा टप्पा क्रं. २ वर विसर्जन घाट व दशक्रिया विधी घाटाचे काम अपूर्ण असल्याने लवकरात लवकर पूर्ण करण्यासंदर्भात सूचना केल्या. तसेच आमदार सरनाईक यांच्या आमदार निधीतून घोडबंदर रोडवर अद्ययावत सिग्नल यंत्रणा बसविण्यात येणार आहे. सिग्नल यंत्रणा कुठे बसवावी, त्याचीही पाहणी वाहतूक शाखेच्या अधिकाऱ्यांसमवेत यावेळी करण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MLA Rohit Pawar : एमपीएससी प्रशासनातील घोटाळा मुंढे बाहेर काढतील असा विश्वास

Water Supply : ३२ समाविष्ट गावातील नागरिकांना दिलासा! महापालिकेचे नवीन धोरण; सदनिकाधारकांना पाणी देणे बिल्डरला बंधनकारक

Latest Marathi News Live Update : शेतकरी कर्जमुक्ती योजनेची तिसरी यादी जाहीर; ३.५१ लाख शेतकऱ्यांना दिलासा

Jammu Kashmir : पूंछमध्ये LoC जवळ मोठा स्फोट; लष्कर-ए-तोयबाचा कमांडर मोहम्मद फैजानसह चौघांचा मृत्यू

IND A vs NZ A: न्यूझीलंड दौऱ्यासाठी भारताच्या संघात मोठा बदल; रिषभ पंत बाहेर, तर २१ वर्षांचा खेळाडू घेणार जागा

SCROLL FOR NEXT