मुंबई

अतिरिक्त शिक्षकांचा मिरा-भाईंदर महापालिकेकडून शोध

CD

भाईंदर, ता. ६ (बातमीदार) : ठाणे जिल्ह्यात अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांचा मिरा-भाईंदर महापालिकेकडून शोध घेतला जात आहे. महापालिकेकडे असलेली शिक्षकांची कमतरता यातून भरून निघणार आहेच, शिवाय या शिक्षकांच्या अनुभवाचा विद्यार्थ्यांनाही फायदा होणार आहे.
मिरा-भाईंदर महापालिकेच्या ३६ शाळांमधून शिक्षकांची कमतरता असली तरी सद्यस्थितीत प्रशासनाला किमान वीस शिक्षकांची आवश्यकता आहे. यासाठी नवीन शिक्षकांची भरती न करता जिल्ह्यात अतिरिक्त ठरलेले शिक्षक घेण्याचा महापालिकेने निर्णय घेतला आहे. अनेक अनुदानित शाळांमधील तुकड्या बंद पडल्याने अथवा वर्गात विद्यार्थ्यांची संख्या कमी झाल्याने शिक्षक अतिरिक्त ठरत असतात. हे शिक्षक राज्य सरकारच्या शिक्षण विभागाकडे समायोजित केले जातात. शासनाकडून नंतर ज्याठिकाणी शिक्षकांची कमतरता असेल त्याठिकाणी ते पाठवले जातात. मात्र अतिरिक्त ठरलेले अनेक शिक्षक दूरवर असलेल्या ठिकाणी जाण्यास तयार होत नाहीत. असे अनेक शिक्षक राज्य सरकारकडून पगार घेत आहेत, मात्र शिक्षणाव्यतिरिक्त अन्य कामे करत आहेत. त्यामुळे महापालिकेकडून अशा शिक्षकांची माहिती घेतली जात आहे.
महापालिकेच्या शाळेत यंदापासून दहावीचे वर्ग सुरू करण्यात आले आहेत. या विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी अनुभवी शिक्षकांची आवश्यकता आहे. त्यामुळे नवीन शिक्षकांची भरती करण्यापेक्षा शिकविण्याव्यतिरिक्त अन्य काम करत असलेले अतिरिक्त शिक्षक घेतले तर त्यांच्या अनुभवाचा विद्यार्थ्यांना नक्कीच फायदा होणार आहे. यासाठी ठाणे जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडे पत्रव्यवहार करून तातडीने हे शिक्षक मागवून घेण्याच्या सूचना आयुक्त दिलीप ढोले यांनी शिक्षण विभागाला दिल्या आहेत.
...
शैक्षणिक दर्जा सुधारण्याचे आदेश
महापालिकेच्या सध्याच्या शाळांचा अतिरिक्त आयुक्त डॉ. संभाजी पनपट्टे व उपायुक्त संजय शिंदे यांनी नुकताच दौरा करून शैक्षणिक दर्जाची पाहणी केली. त्यानंतर आयुक्त दिलीप ढोले यांनी सर्व शाळांच्या मुख्याध्यापकांना पाचारण करून त्यांची बैठक घेतली. महापालिकेच्या शाळांमध्ये अत्याधुनिक सोयी-सुविधा उपलब्ध केल्या जात आहेत. त्याच्या जोडीला शाळांच्या शैक्षणिक दर्जामध्येही वाढ होणे आवश्यक आहे. शिक्षकांनी त्यासाठी प्रयत्न करावेत, त्यात सुधारणा दिसली नाही तर संबंधित शिक्षकांना नोटिसा बजावण्यात येतील व नंतर निलंबनाची कारवाई केली जाईल, अशी तंबी आयुक्तांनी दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Politics: महायुतीत नवं राजकीय समीकरण! छगन भुजबळ दिल्लीला जाणार; पुतण्याला मंत्रिपद मिळणार? मोठा राजकीय डाव

मोफत गणवेश योजना पुन्हा अडचणीत! २४० रुपयांत शर्ट-पॅन्ट कसं शिवायचं? कमी निधीमुळे मुख्याध्यापकांची डोकेदुखी वाढली

Vladimir Putin: ''एकेकाळी अमेरिकेने मोदींवर निर्बंध आणले होते, मात्र आज...'', पुतिन यांनी करुन दिली भारताच्या ताकदीची जाणीव

Latest Marathi News Update: धुळे जिल्ह्यातील टंचाईग्रस्त ग्रामांसाठी तब्बल 48 खाजगी विहिरी अधिग्रहित

Suryakumar Reaction: कॅप्टन्सी पण गेली अन् संघातूनही काढलं, नव्या कर्णधारासह टीम जाहीर होताच काय म्हणाला सूर्या?

SCROLL FOR NEXT