मुंबई

राहूल गांधीच्या समर्थनार्थ काँग्रेसचे मुंबईत आंदोलन

CD

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ७ : राहुल गांधी हे देशातील लोकशाही टिकवण्यासाठी आणि संविधान वाचविण्यासाठी लढा देत आहेत. त्यांना पाठिंबा देण्यासाठी आणि मोदी सरकारविरोधात मुंबई काँग्रेसने आंदोलन केले. मुंबई काँग्रेस अध्यक्षा वर्षा गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली आज (ता. ७) चेंबूर नाका येथे लोकशाहीर अण्णा भाऊ साठे पुतळ्याजवळ आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात मुंबई काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. तसेच उत्तर मुंबईत आमदार अस्लम शेख, विलेपार्ले येथे माजी मंत्री नसीम खान आणि दक्षिण मुंबईत माजी आमदार मधू चव्हाण यांनीदेखील आंदोलन केले. या आंदोलनामध्ये सर्व जिल्हाध्यक्ष कालू बुधेलिया, क्लाइव्ह डायस, जगदीश अमीन, अब्राहम रॉय मणी, हुकुमराज मेहता आणि प्रमोद मांद्रेकर सहभागी झाले होते आणि काँग्रेसचे स्थानिक नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shivneri Kabaddi Tournament: अमर हिंदच्या विजयात सेजल कांबळे चमकली; जय भारत, यश, विश्वशांतीसह मुंबई पोस्टलचीही आगेकूच

आजचे राशिभविष्य - 16 ऑक्टोबर 2026

Navratri Upvas Recipe: बटाटा-खोबऱ्याचे चटपटीत कॉम्बिनेशन! नवरात्रीच्या उपवासाला बनवा खमंग, कुरकुरीत फराळी पॅटिस...

सीजेपीच्या 'तिरंगा मार्च'ला आडकाठी! दिल्लीतील सेंट्रल पार्क बंद ठेवण्याचा निर्णय; अभिजित दीपकेंची पहिली प्रतिक्रिया, '100 ठिकाणी...'

Drunk and Driver : कोथरूडमध्ये ‘ड्रंक अँड ड्राइव्ह’चा थरार; तीन ते चार जण किरकोळ जखमी, २४ वर्षीय कारचालक विद्यार्थी पोलिसांच्या ताब्यात

SCROLL FOR NEXT