मुंबई

भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने वर्षावास मालिकेला प्रारंभ

CD

पेण, ता. १७ (वार्ताहर) : तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या जीवनात पौर्णिमेला महत्त्वपूर्ण स्‍थान होते. त्‍यामुळे आषाढ पौर्णिमा ते आश्विन पौर्णिमा या तीन महिन्यांकरिता संपूर्ण देशभर वर्षावास मालिका सुरू होते. याच अनुषंगाने भारतीय बौद्ध महासभा पेण शाखेच्या वतीने या वर्षावास मालिकेस प्रारंभ झाला आहे. शहरातील क्रांतीनगर येथील श्रवण बुद्धविहारात प्रवचनकार संतोष जाधव यांनी भगवान गौतम बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन चरित्राविषयी उपस्थिताना माहिती दिली; तर गागोदे येथे प्रवचनकार एम. जी. यांनी बौद्धांची पवित्र स्थळे या विषयावर आपल्या प्रवचनाच्या माध्यमातून प्रबोधन केले. तीन महिने सुरू असणारी वर्षावास मालिका तालुक्यातील सर्व ठिकाणी होणार असल्याने समाजातील प्रत्येक नागरिकांनी यामध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन तालुकाध्यक्ष चंद्रकांत सोनवणे यांनी केले आहे. या वेळी संजय गायकवाड, प्रदीप गायकवाड, सुनील शिंदे, शशिकला गायकवाड, लक्ष्मण सताणे, भास्कर कांबळे, सुनील खरात, जयेश शिरसाट आदींसह नागरिक उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bandra Accident: श्रीमंतीचा माज! मोबाईलवर बोलत उडवलं, ८ वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू, प्रकरण दाबण्यासाठी साक्षीदाराला पैशांची ऑफर

Nagpur School Bomb Threat: धमकीच्या सावटात १८ शाळांमध्ये शोध मोहीम; बॉम्बशोधक व नाशक पथकाकडून तपासणी; काही शाळांनी मध्येच दिली सुटी

Aadhaar Activation: दोन वर्षे आधारसाठी चकरा; राजदंड हातात घेऊन तहसील कार्यालयात धडक, ७७ वर्षीय जयराम वळवींचा लढा यशस्वी

Marathi News Live Updates : हाकेंना पुण्यातच रोखलं, मोर्चाला परवानगी नाही; पुणे पोलिसांची कारवाई

अपघातात पत्नीचा मृत्यू, शेवटचं पाहण्यासाठी पती व्हिलचेअरवरून स्मशानभूमीत; आईच्या मायेला पोरकं झालेल्या चिमुकल्यांचा टाहो

SCROLL FOR NEXT