मुंबई

यशोधन शाळेत रंगला एकलव्य पुरस्कार सोहळा

CD

ठाणे, ता. १८ (बातमीदार) : ठाणे तसेच नवी मुंबई भागात गेली ३५ वर्षे कार्यरत असणाऱ्या ‘वी नीड यू सोसायटी’मार्फत आर्थिक परिस्थितीचा सामना करत दहावी पास करणाऱ्या ३४ विद्यार्थ्यांना एकलव्य पुरस्कार प्रदान करण्यात आला. या पुरस्कार सोहळ्यात ठाण्यातील शास्त्रीनगर भागात असलेल्या यशोधन इंग्रजी व मराठी माध्यमातील विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला.

पुरस्कार वितरण समारंभाची सुरुवात २०२२ च्या एकलव्य विद्यार्थिनी भूमिका शिंदे आणि तनुजा मोरे यांनी साने गुरुजींच्या जगाला प्रेम अर्पावे या गीताने केली. संस्थेचे कोषाध्यक्ष जयंत कुलकर्णी यांनी स्वागतपर मनोगत व्यक्त केले. संस्थेच्या कार्यकर्त्या अनघा काकडे यांनी संस्थेच्या कामाचा परिचय तसेच एकलव्य पुरस्काराची भूमिका विशद केली. एकलव्य विद्यार्थिनी यशोदा जंगले हिने गौरवपत्राचे वाचन केल्यानंतर सर्व यशस्वी विद्यार्थी-विद्यार्थिनींचा सत्कार करण्यात आला. एकलव्य विद्यार्थिनी सेजल मचाले हिने कार्यक्रमाचे सूत्रसंचालन; तर आभार प्रदर्शन संस्थेचे सचिव अतुल गोरे यांनी केले.

ज्येष्ठ राजकीय पत्रकार रणधीर कांबळे आणि सरस्वती मंदिर ट्रस्टच्या पूर्व प्राथमिक विभागाच्या प्रमुख रती भोसेकर यांच्या हस्ते हा पुरस्कार सोहळा पार पडला. वी नीड यू सोसायटीचे माजी अध्यक्ष डॉ. मकरंद घारपुरे पुरस्कार सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी होते.
आपल्याकडे सहज शिक्षणाकडे अक्षम्य दुर्लक्ष झालेले आहे. मूल स्वतःच स्वतः शिकत असते, पण आपण त्याला तीन वर्षांपासून काही तरी शिस्तीने शिकवायला सुरुवात करतो आणि मग त्याचे स्वतःचे शिकणे थांबून जाते. हा धोका ओळखून आपण पूर्व प्राथमिक स्तरापासून सहज शिक्षणाकडे वळले पाहिजे, असे मत रती भोसेकर यांनी मांडले. वेगवेगळी बंधने, अडचणी, कमतरता यांना धैर्याने सामोरे जाऊन तुम्ही हे यश मिळवलेले आहे, त्यामुळे तुम्ही खरोखर एकलव्य पुरस्कारास पात्र आहात, या शब्दांत सर्वांचे कौतुक रणधीर कांबळे यांनी केले.

या कार्यक्रमास यशोधन शाळेचे विश्वस्त दत्तात्रय खातू, वी नीड यू संस्थेचे जगदीश खैरालिया, हितचिंतक शेखर खोब्रेकर, तरुण उद्योजक सामी सय्यद, डॉ. शीतल मोघे, तसेच शाळेचे शिक्षकगण आणि गेल्या दोन वर्षांतील एकलव्य विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Fuel Rate: सर्वसामान्यांना पुन्हा झटका? पेट्रोल-डिझेलचे दर ५ रुपयांनी वाढण्याची शक्यता; भाववाढीबाबत तज्ज्ञांचा मोठा इशारा

New Fuel Launch: E85 इंधन आलं पण तुमच्या E20 आणि पेट्रोल गाडीचं काय होणार? सरकारने दिलं स्पष्टीकरण

India A Squad: भारत अ संघाची घोषणा! ध्रुव जुरेलकडे मोठी जबाबदारी, 'या' युवा वेगवान गोलंदाजाची लागली लॉटरी

Transgenders Scheme: तृतीयपंथीयांसाठी सरकारचा मोठा निर्णय, व्यवसायासाठी २ लाख मिळणार; कसा लाभ घेता येणार?

Shreyas Iyer अडीच वर्षे T20I संघातून बाहेर असूनही का झाला थेट टीम इंडियाचा कॅप्टन? अजित आगरकरांनी सांगितलं खरं कारण

SCROLL FOR NEXT