Students brutally beaten by NCC leader fear among parents thane  sakal
मुंबई

Thane News : एनसीसीच्या लिडरकडून विद्यार्थ्यांना बेदम मारहाण; पालकांमध्ये भीतीचे वातावरण

प्रशिक्षणात विद्यार्थ्यांना आर्मी आणि नेव्हीचे प्रशिक्षणपूर्व धडे देण्यात येतात.

सकाळ वृत्तसेवा

ठाणे : शहरातील जोशी-बेडेकर आणि बांदोडकर महाविद्यालयात एनसीसीच्या विद्यार्थ्यांना जनावरांसारखी मारहाण केल्याचा प्रकार गुरुवारी (ता. ३) उघडकीस आला आहे. ही बाब एका व्हिडीओच्या माध्यमातून समोर आली असून विद्यार्थी आणि पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे;

मात्र विद्यार्थ्यांना मारहाण करणारी व्यक्ती शिक्षक नसून तो महाविद्यालयाचा विद्यार्थीच आहे, या विद्यार्थ्यावर कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली असल्याची माहिती महाविद्यालयामार्फत देण्यात आली.

ठाणे शहरातील विद्या प्रसारक मंडळाच्या जोशी-बेडेकर कला, वाणिज्य विभागातील प्रांगणात बांदोडकर, जोशी-बेडेकर आणि पॉलिटेक्निक या तिन्ही विभागांतील एनसीसीच्या विद्यार्थ्यांना संयुक्त पद्धतीने प्रशिक्षण दिले जाते. या प्रशिक्षणात विद्यार्थ्यांना आर्मी आणि नेव्हीचे प्रशिक्षणपूर्व धडे देण्यात येतात.

या प्रशिक्षणादरम्यान विद्यार्थ्यांकडून एखादी चूक झाल्यास त्यांना शिक्षाही करण्यात येते; परंतु ही शिक्षा अमानवी प्रकारची असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. एनसीसी प्रशिक्षणादरम्यान विद्यार्थ्यांकडून चूक झाल्यामुळे त्यांना भरपावसात पाण्यामध्ये गुडघ्यावर टेकवून काठीने जोरजोरात फटके दिले जात असल्याचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. या व्हिडीओमुळे विद्यार्थ्यांमध्ये एनसीसीबाबत दहशत पसरली आहे.

एनसीसीचे हेड हे सिनियर विद्यार्थीच असतात; परंतु हा प्रकार खूप घृणास्पद घडला आहे. शिक्षक नसताना झालेला हा प्रकार असून त्या सिनिअर विद्यार्थ्यावर तत्काळ कारवाई करण्याची प्रक्रियाही सुरू करण्यात आली आहे. त्याचबरोबर हे असले प्रकार यापुढे होऊ नयेत, यासाठी एका समितीची स्थापना तत्काळ करत आहोत. विद्यार्थ्यांनी कोणत्याही प्रकारची काळजी करू नये.
- डॉ. सुचित्रा नाईक, प्राचार्या, जोशी-बेडेकर महाविद्यालय

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Without Fear or Favour Book Controversy : "विदाउट फ़ियर ऑर फ़ेवर" पुस्तकातील दाव्यांची जोरदार चर्चा; न्यायपालिकेच्या स्वातंत्र्यावरून नवा वाद!

सूर्याचा राहूच्या नक्षत्रात प्रवेश; वृषभसह ५ राशींना नोकरी अन व्यवसायात आर्थिक लाभ

IMD Weather Alert : चक्रीवादळाने रौद्ररूप धरले! ताशी १०० किमी वेगाने सुटणार सोसाट्याचा वारा; 'या' राज्यांत मुसळधार पाऊस, महाराष्ट्रात काय घडणार?

फ्लिपकार्टच्या गोदामातून ९८० सॅमसंग मोबाईल चोरीला; पुरावा मिळू नये म्हणून CCTV चा डीव्हीआरही पळवला...

Jamgaon News: रविवारी सुट्टी असतानाही सीईओंची जामगावला भेट; अपघातात मृत सेविकेच्या कुटुंबीयांचे सांत्वन

SCROLL FOR NEXT