मुंबई

कुरारमध्ये बौद्ध महासभेचे चिंतन शिबीर संपन्न

CD

कुरारमध्ये बौद्ध महासभेचे चिंतन शिबीर
मालाड, ता. ७ (बातमीदार) ः भारतीय बौद्ध महासभेचे चिंतन शिबीर कुरार व्हिलेज भीमनगर २ येथील धम्मगिरी बुद्ध विहारात ६ ऑगस्‍ट रोजी पार पडले. या वेळी महासभेचे मुंबई प्रदेश सरचिटणीस रवींद्र गवई मार्गदर्शक होते. झोन ४ चे अध्यक्ष प्रमोद पगारे यांचीही या वेळी उपस्थिती होती; तर कार्यक्रमाचे अध्यक्ष बौद्धाचार्य मारुती ओव्हाळ होते. अतिष जावळे यांनी सूत्रसंचालन केले. या चिंतन शिबिराला झोन ४ अंतर्गत भीमनगर, मालाड शाखा, क्रांती नगर कांदिवली शाखा, दामू नगर कांदिवली शाखा, शैलेंद्र नगर दहिसर शाखा येथील प्रमुख कार्यकर्त्या, कार्यकर्ते उपस्थित होते. या वेळी बौद्ध सभासद अभियान राबवण्यात आले. चिंतन शिबिरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची धम्म क्रांती गतिमान कशी करावी याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. या वेळी भीमनगरमध्ये होत असलेल्या वर्षावास कार्यक्रमाचे उद्‍घाटन प्रमुख मार्गदर्शक रवींद्र गवई यांच्या हस्ते करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Share Market: एका वर्षात 1847 टक्के रिटर्न, हे आहेत 'ते' 5 स्टॉक; किंमत 100 रुपयांपेक्षाही कमी

गोव्यात रंगणार पहिली लिजेंड्स प्रो टी20 लीग; धवन, हरभजन, वॉटसन, स्टेनसह दिग्गज होणार सहभागी

Latest Marathi News Live Update :बदलापुरात एकाच घरातील सहाजणांना निवडणुकीचं तिकीट

Sangli Politics : "तासगाव पालिकेत पुन्हा भाजपची सत्ता! ‘सोशल इंजिनिअरिंग’सह भक्कम पॅनेल जाहीर करून महाडिकांचा विजयाचा दावा"

Bigg Boss Marathi 6 मध्ये दिसणार 'पिंकीचा विजय असो फेम अभिनेत्री? साऊथही गाजवलंय, नावाची जोरदार चर्चा

SCROLL FOR NEXT