मुंबई

दुचाकी अपघातात तरुण ठार; एक गंभीर

CD

नवी मुंबई, ता. २१ (वार्ताहर) : वाशी येथून पाम बीचमार्गे उलवे येथे जात असलेल्या तरुणांच्या दुचाकीला अज्ञान वाहनाने धडक दिल्याने झालेल्या अपघातात एका तरुणाचा मृत्यू झाला. या अपघातात दुसरा एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना सोमवारी (ता. २१) पहाटे अडीचच्या सुमारास नेरूळ येथील सारसोळे जंक्शन येथे घडली. नेरूळ पोलिसांनी या अपघातातील अज्ञात वाहन चालकाविरोधात गुन्हा दाखल करून त्याचा शोध सुरू केला आहे. मनदीप सुरजलाल सिंग (वय २६) असे अपघातील मृताचे नाव आहे; तर विवेक स्वामी (वय २७) असे जखमीचे नाव आहे. हे दोघेही उलवे येथे राहण्यास असून रविवारी रात्री मित्राची दुचाकी घेऊन वाशी येथे गेले होते. त्यानंतर हे दोघेही पहाटे सव्वा दोनच्या सुमारास दुचाकीवरून पामबीच मार्गाने उलवे येथे जात होते. त्यांची दुचाकी पामबीच मार्गावरील सारसोळे जंक्शनवर आली असताना अज्ञात वाहनाने त्यांना धडक दिली. यात मनदीप सिंग हा गंभीर जखमी झाल्याने त्याचा काही वेळातच मृत्यू झाला. जखमी विवेक स्वामी याच्यावर डी. वाय. पाटील हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BJP President: भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदासाठी महिलेला संधी? निर्मला सीतारामन यांच्यासह 'या' नावांची होतेय चर्चा

Mumbai News: कबुतरांना खाद्य देण्यावर निर्बंध, तरीही लोकं ऐकेनात; आता पालिका राबवणार विशेष मोहीम

Jacqueline Fernandez : जॅकलीन फर्नांडिसला दिल्ली उच्च न्यायालयाचा जबरदस्त झटका!

IND vs ENG 2nd Test : ३० चौकार, ३ षटकार! शुभमन गिलचे त्रिशतक थोडक्यात हुकले; पठ्ठ्याने इंग्लंडचे मैदान गाजवले, भारताचा धावांचा डोंगर

Pune News : महिला कर्मचाऱ्याने कामाला लावण्यासाठी सुमारे २५ जणांकडून हजारो रुपये उकळले; चौकशी केली, पण अहवाल अर्धवट

SCROLL FOR NEXT