मुंबई

बोईसर ग्रामपंचायत सदस्यांचे ठिय्या आंदोलन

CD

मनोर, ता. २० (बातमीदार) : ग्रामपंचायतीच्या कामकाजाची कागदपत्रे बोईसर ग्रामपंचायतीच्या सदस्यांना दिली जात नाहीत, असा आरोप करीत बोईसर ग्रामपंचायतीच्या पाच सदस्यांनी नुकतेच ग्रामपंचायत कार्यालयात ठिय्या आंदोलन केले. ग्रामपंचायतीच्या मासिक सभेत कामकाजाची कागदपत्रे उपलब्ध करून देण्याबाबतचा मुद्दा उपस्थित करण्यात आला होता; मात्र ग्रामपंचायत पदाधिकारी आणि प्रशासनाकडून टाळाटाळ करण्यात येत असल्याचा आरोप ग्रामपंचायत सदस्य राजेश करवीर यांनी केला आहे.

ग्रामपंचायत सदस्यांनी आठवडाभरापूर्वी ठिय्या आंदोलनाचा इशारा दिला होता. त्यानंतर ग्रामविकास अधिकारी रमाकांत चव्हाण यांनी सदस्यांना ग्रामपंचायत कामकाजाची कागदपत्रे दोन दिवसांत उपलब्ध करून देण्याचे मान्य केले होते; मात्र त्यानंतर आठवडाभराचा कालावधी झाला तरी कागदपत्रे उपलब्ध करून देण्यात आली नाहीत. त्यामुळे राजेश करवीर यांच्यासह पाच ग्रामपंचायत सदस्यांनी बोईसर ग्रामपंचायत कार्यालयात ठिय्या आंदोलन सुरू करण्यात आले आहे.

बोईसर ग्रामपंचायतीचे सरपंच भाजप पुरस्कृत आहेत. उपसरपंच शिंदे गटाचे आहेत. या दोघांकडून लोकशाही मूल्यांची पायमल्ली होत आहे. तसेच निवडून आलेल्या सदस्यांना सापत्न वागणूक दिली जात असल्याचा आरोप करण्यात येत आहे. त्यामुळेच ग्रामपंचायत सदस्यांना आंदोलन करण्याची वेळ आल्याची संतप्त भावना आंदोलकांनी व्यक्त केली.

मासिक सभेत ग्रामपंचायतीच्या कामकाजाची सर्व माहिती सदस्यांना दिली जाते; मात्र कुणाला माहिती हवी असल्यास त्यांनी माहिती अधिकारात मागवावी, प्रमाणित माहिती उपलब्ध करून दिली जाईल, सदस्यांना कामकाजाची माहिती लपवण्याचे कारण नाही.
़- रमाकांत चव्हाण, ग्रामविकास अधिकारी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नालासोपारा ZP शाळेत कुकरचा स्फोट; भडका उडताच गरम खिचडी चिमुकल्यांच्या अंगावर; 2 विद्यार्थ्यांसह महिला जखमी

Kharge Rally Controversy : मल्लिकार्जुन खर्गेंच्या रॅलीनंतर 'शुद्धीकरण' वाद पेटला! राज्यभरातून 80 तक्रारींनंतर पोलिसांचं मोठं पाऊल, काय आहे नेमकं प्रकरण?

मुंबईत पीएम मोदींच्या कार्यक्रमापूर्वी सुरक्षेत मोठी त्रुटी! बंदूकधारी अन् बनावट PMO अधिकाऱ्याला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

Marathi News Live Updates : मिरवणूक बंदीकडे चाललेली पावले थांबली नाहीत तर भविष्यात उत्सवच बंद होतील - साऊंड असोसिएशन

नावही माहिती नसलेल्या खेळांचे बोगस प्रमाणपत्र! वर्ग १ आणि वर्ग २च्या नोकऱ्या मिळवल्या; दोघे अटकेत, एक हजार सर्टिफिकेट वाटल्याचा दावा

SCROLL FOR NEXT