मुंबई

सातपाटी बंदरासाठी सुधारित अंदाजपत्रक

CD

पालघर, ता. ३१ (बातमीदार) : सातपाटी हे पालघर जिल्ह्यातील प्रमुख मासेमारी बंदर आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात चवदार पापलेटसाठी सातपाटीची ओळख आहे. या बंदराच्या मत्स्य व्यवसाय क्षेत्रातील पायाभूत सुविधांच्या विकासासाठी २८१.०४ कोटींच्या रकमेस जून महिन्यात मान्यता मिळाली होती; मात्र बांधकाम वस्तूंमध्ये झालेली भाववाढ लक्षात घेता या कामांसाठी ३५४ कोटी २२ लाख रकमेचे सुधारित अंदाजपत्रक सरकारला पाठवण्यात आले आहे. या वाढीव रकमेस मान्यता मिळाल्यास प्रत्यक्ष कामास सुरुवात होणार आहे.

सातपाटी बंदराच्या विकासासाठी पर्यावरणविषयक परवानगी घेण्यात आली आहे. २६ सप्टेंबर २०२३ रोजी उच्च न्यायालयाकडून ही परवानगी प्राप्त झाली. सातपाटी गावाची अंदाजित लोकसंख्या २२ हजार असून तिथे ३५० बोटी मासेमारीचा व्यवसाय करतात. मच्छीमारांना आवश्यक सुविधा पुरवून मत्स्य व्यवसायात वाढ होण्याच्या दृष्टीने मत्स्यव्यवसाय विभागाकडे वाढीव रकमेचा प्रस्ताव सादर करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.

स्थानिकांना होणार लाभ
हा प्रकल्प पूर्ण झाल्यावर स्थानिक मच्छीमार मासेमारी बोटी सुरक्षित नांगरू शकतात. लँडिंग, मासे हाताळणी, खरेदी-विक्री, मासे साठविणे यांसारखी अनेक विकासात्मक कामे या बंदरात होणार आहेत. परिणामी मासेमारी व्यवसायात वाढ होण्यास मदत होणार आहे. या बंदराच्या विकासासाठी ६ जून रोजी २८१.०४ कोटी प्रशासकीय मान्यता देण्यात आली होती.

आयआयटी मुंबईचा अहवाल
सातपाटी प्रकल्पाच्या बॅकवॉटरचा अभ्यास करण्यासाठी भारतीय तंत्रज्ञान संस्था, मुंबई (आयआयटी) यांना २४ एप्रिल २०२३ रोजी कळविण्यात आले होते. त्यांचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर सुधारित मांडणी (लेआऊट) सुचविण्यात आले आहे. त्यानुसार बॅकवॉटरच्या लांबी, रुंदी, उंचीमध्ये बदल झाला आहे. त्यामुळे अंदाजपत्रकाच्या किमतीत वाढ झाली आहे. ३५४.३५ कोटी रकमेचे सुधारित अंदाजपत्रक तयार करून सरकारकडे नवीन प्रस्ताव सादर करून मान्यतेसाठी पाठवण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

iphoneच्या इतिहासात पहिल्यांदाच! Appleने लॉन्च केला पहिला फोल्डेबल iPhone Duo; मिळणार iPadसारखा अनुभव

iPhone 18 Pro अन् Pro Max मध्ये Apple ने केला मोठा धमाका! 2nm चिप, जबरदस्त कॅमेरा अन् AI फीचर्सने वेधलं लक्ष; किंमत किती?

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

Vastu Tips: घरात-बाल्कनीत पक्ष्यांचे घरटे असावे की नाही? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या घरटे हटवणे योग्य की अयोग्य?

Pune News : सत्ता असूनही प्रशासनावर अंकुशच नाही! भाजप नगरसेवकांचा घरचा आहेर; पदाधिकाऱ्यांवरही व्यक्त केली नाराजी

SCROLL FOR NEXT