मुंबई

शिवडीत बच्चेकंपनीचा आगळावेगळा दीपोत्सव

CD

शिवडीत बच्चेकंपनीचा आगळावेगळा दीपोत्सव
शिवडी, ता. ५ (बातमीदार) ः सणांचे महत्त्व समजावे, मराठी शाळा व मराठी भाषा टिकावी, त्याचबरोबर विद्यार्थ्यांच्या मनात गड व किल्ले यांच्याबद्दल प्रेम व आदर निर्माण व्हावे यासाठी अभुदय एज्युकेशन सोसायटीच्या मराठी प्राथमिक शाळेमध्ये नुकतेच मुख्याध्यापिका सुप्रिया खैरे यांच्या संकल्पनेतून शिक्षकांनी विद्यार्थी व पालकांच्या मदतीने एक आगळा-वेगळा दीपोत्सव साजरा केला.
यावेळी वर्गासमोर रांगोळ्या काढण्यात आल्‍या होत्‍या. आकाश कंदील आणि दिवे लावण्यात आले होते. विद्यार्थ्यांना फराळ वाटप करण्यात आले. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांचे गड-किल्ले प्रदर्शन भरवण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी तयार केलेले विविध किल्ले या प्रदर्शनाचे मुख्य आकर्षण ठरले. ज्या विद्यार्थ्यांनी किल्ले बनवले त्या विद्यार्थ्यांनी किल्ल्यांची माहितीदेखील दिली. प्रदर्शनासाठी किशोरी तेली, लक्ष्मण ठाकरे, धोंडीराम दळवी या चौथीच्या वर्गशिक्षकांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले; तर प्रदर्शनाची मांडणी व आकर्षक सजावट कलाशिक्षक नरेश पाटील यांनी केले. शाळेचे माजी विद्यार्थी व दुर्गवीर अमित जगताप, प्रशांत वाघरे, मयूर विचारे यांनी प्रदर्शनाला भेट देऊन किल्ल्यांचे महत्त्व सांगितले. दरम्यान, खाऊ व भेटवस्तू देऊन विद्यार्थ्यांचे कौतुक करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nepal Flood: नेपाळच्या मदतीला भारत धावला! महापुरामुळे वीज संकट; मागणीनुसार अतिरिक्त वीजपुरवठा करणार

Asia Cup 2026: बलाढ्य टीम इंडिया शफालीच्या फिफ्टीनंतरही थायलंडसमोर ढासळली; किती धावांचे ठेवले टार्गेट?

Abhijeet Dipke: विजेता दहिया यांची CJPमध्ये एन्ट्री होणार? अभिजीत दिपकेंनी दिलं मोठं उत्तर; स्पष्ट केली भूमिका

Manoj Jarange : मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाला अभिजीत दिपकेंचा पाठिंबा; सरकारला दिला थेट इशारा

ENG vs PAK: जो रुटचा पाकिस्तानविरुद्ध लॉर्ड्सवर खेळताना विश्वविक्रम! सचिन तेंडुलकर, पाँटिंगलाही टाकलंय मागे

SCROLL FOR NEXT