मुंबई

Maharashtra Politics: महायुतीतील घटक पक्षांची मन जुळणार; आता जिल्ह्याजिल्ह्यात राबवला जाणार हा उपक्रम

Maharashtra Mahayuti : विधीमंडळ समित्यांवरील नियुक्त्याही आता घोषित होतील. काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांना लोकलेखा समितीचे प्रमुखपद मिळण्याची शक्यता आहे.

मृणालिनी नानिवडेकर ः सकाळ न्यूज नेटवर्क

Maharashtra Politics: भाजप- शिंदेसेना आणि अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेत तर एकत्र आहेत. ती एकी आता जनतेच्या मनात पोहोचावी यासाठी जानेवारी महिन्यापासून एकत्र सभा तसेच संमेलने आयोजित होणार आहेत. कार्यकर्त्यांचे आपापसात मनोमिलन घडवून आणणे आवश्यक आहे. लोकसभेतील यशाचा मार्ग एकीतून जातो असेही ठरले. त्यानुसार महायुतीच्या एकत्रित सभा आयोजित करण्यात येणार आहेत.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आशीर्वाद यात्रा जानेवारीत सुरू होणार होती. त्यात आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार सहभागी होण्याची शक्यता आहे. आज समन्वय समितीच्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींचे ‘भारताला बलशाली करणारे विकास काम’ हेच आगामी काळातल्या प्रचाराचे धोरण असेल, असे ठरवण्यात आले आहे.

सत्तेचा लाभ तिन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांना मिळावा यासाठी महामंडळांच्या नियुक्त्या येत्या १० दिवसांत पूर्ण केल्या जातील. ५०: २५ : २५ असे जागावाटपाचे सूत्र प्रस्तावित होते. त्याबद्दल वाद न घालता निर्णय घेण्याचे निश्चित झाले आहे. विधीमंडळ समित्यांवरील नियुक्त्याही आता घोषित होतील. काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांना लोकलेखा समितीचे प्रमुखपद मिळण्याची शक्यता आहे.

वेणुगोपाल नागपुरात
तीन राज्ये हातातून गेली असली तरी काँग्रेसला मिळालेली मते ही भाजपला आपण पर्याय आहोत हे दाखवणारी आहेत. पक्षाला पर्याय म्हणून उभे करण्यासाठी संघटनात्मक बांधणी करणे गरजेचे वाटते आहे. पक्ष कार्यकर्त्यांना लढण्याचे बळ देण्यासाठी काँग्रेसची बैठक होणार आहे. पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल शुक्रवारी (ता.१५) नागपुरात येत आहेत. महाविकास आघाडीच्या प्रचारासाठी महाराष्ट्रात राहुल गांधींच्या सभा होणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC विद्यार्थ्यांचं आंदोलन मागे, चौकशी पूर्ण होईपर्यंत अध्यक्ष सक्तीच्या रजेवर; मध्यरात्री घडामोडी, पुण्यात आंदोलकांचा जल्लोष

IND vs WI, 3rd T20I: "विंडीजला हलक्यात घेऊ नका...", विजयानंतरही श्रेयस अय्यरची चिंता मिटेना; काय म्हणाला, वाचा

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

Maharashtra Weather : राज्यात ऑक्टोबर हिटचा तडाखा कायम! उन्हाचा चटका वाढणार; जाणून घ्या तुमच्या जिल्ह्यात कसे असेल हवामान?

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

SCROLL FOR NEXT