मुंबई

अयोध्येतील राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे एकनाथ शिंदेंना आमंत्रण

CD

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ८ : अयोध्येतील श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे आमंत्रण शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांना मिळाले असून या सोहळ्यासाठी अयोध्येला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कोकण प्रांत संपर्कप्रमुख अजय जोशी आणि विश्व हिंदू परिषदेचे संयुक्त क्षेत्र संपर्कप्रमुख संजय ढवळीकर यांनी आज सकाळी शिंदे यांच्या ठाणे येथील निवासस्थानी त्यांना अयोध्येतील राम मंदिर उद्‍घाटन सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी आमंत्रित केले. हे आमंत्रण शिंदे यांनी स्वीकारले असून त्यांनी अयोध्येला जाणार असल्याचे सांगितले.

अयोध्येत श्रीरामाचे भव्य मंदिर उभारले जावे, असे दिवंगत हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न होते. दिवंगत आनंद दिघे यांनीही अयोध्येतील राम मंदिर उभारण्यासाठी ठाण्यातून चांदीची वीट अयोध्येला पाठवली होती. रामजन्मभूमी आंदोलनात अनेक शिवसैनिकांनी सक्रिय सहभाग घेतला होता. या साऱ्यांचे स्वप्न साकार होत असताना या क्षणी प्रत्यक्ष उपस्थित राहून याची देही याची डोळा पाहणे ही आपल्यासाठी परम् भाग्याची गोष्ट असल्याने या अभूतपूर्व सोहळ्याला आपण नक्की उपस्थित राहू, असे शिंदे यांनी या वेळी सांगितले. अयोध्येतील श्रीराम मंदिराचा लोकार्पण सोहळा येत्या २२ जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शुभहस्ते पार पडणार आहे. या सोहळ्यासाठी देशभरातील विविध क्षेत्रांतील अनेक मान्यवर आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील घटक पक्षांच्या प्रमुख नेत्यांना आमंत्रित करण्यात आले आहे. याच भावनेतून भारतीय जनता पक्षाचा जुना सहकारी आणि एनडीएमधील प्रमुख घटक पक्ष असलेल्या शिवसेनेलाही या सोहळ्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. अयोध्येतील राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न होत असताना राज्यातही १८ ते २२ जानेवारीदरम्यान अनेक उपक्रम आयोजित करून हा क्षण एखाद्या सणाप्रमाणे साजरा करावा, असे आवाहन तमाम शिवसैनिकांना आणि पक्ष पदाधिकाऱ्यांना शिवसेना पक्षाच्या वतीने करण्यात आले आहे. यासाठी घरावर भगवे ध्वज, दारासमोर पणत्या, परिसरात भगव्या पताका आणि मंदिरांना विद्युत रोषणाई करून हा क्षण मोठ्या प्रमाणात साजरा करावा, असे आवाहन यापूर्वीच करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

DK Shivakumar Net Worth : डी. के. शिवकुमार देशातील 'सर्वात श्रीमंत मुख्यमंत्री! 5 वर्षांत संपत्तीत 500 कोटींची वाढ, त्यांच्यावर अनेक गुन्हे दाखल

West Bengal Political Crisis : ममतांना मोठा धक्का, 60 बंडखोरांनी मांडली वेगळी चूल; गटनेते पदी ऋतब्रत यांची निवड, पक्ष चिन्हावरही केला दावा

दक्षिण मुंबईत वीज संकट! BEST अ‍ॅक्शन मोडमध्ये; 690 कर्मचाऱ्यांची भरती होणार, वारंवार बत्तीगुल होत असल्याने मोठा निर्णय

इतके उद्योग करूनही 'कमळी' अखेर परीक्षेत पास झालीच; किती टक्के मिळाले माहितीयेत? प्रेक्षकांनाही आश्चर्याचा धक्का

Latest Marathi News Live Update: दहा शेतकऱ्यांच्या कृषीपंपांचं केबल चोरीस

SCROLL FOR NEXT