BJP esakal
मुंबई

Palghar News: गर्भवतीच्या मृत्यूप्रकरणी चौकशी करणार; भाजप महिला पदाधिकाऱ्याची माहीती

सकाळ वृत्तसेवा

Palghar News: शिरसगाव ग्रामपंचायतीमधील गणेशवाडी येथील गर्भवती व तिच्या गर्भाचा काही दिवसांपूर्वी मृत्यू झाला होता. या घटनेची माहिती मिळताच भाजप आदिवासी आघाडीचे प्रदेश सचिव डॉ. हेमंत सवरा यांनी पीडित कुटुंबाच्या घरी जात सांत्वन केले. या घटनेची गंभीर दखल घेऊन सखोल चौकशी केली जाईल व दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल, असे कुटुंबाला सवरा यांनी आश्वासन दिले.

गर्भवती रूपाली भाऊ रोज (वय २५) हिला मोखाडा ग्रामीण रुग्णालय येथे उपचाराकरिता दाखल करण्यात आले होते. मात्र तिच्या गर्भाचा पोटातच मृत्यू झाल्यामुळे तिला नाशिक जिल्हा रुग्णालयात पुढील उपचारासाठी हलवले होते. त्या ठिकाणी तीन दिवस उपचार केल्यानंतर रूपालीचा मृत्यू झाला.

त्यामुळे कुटुंबीयांना प्रचंड मानसिक धक्का बसला आहे. या घटनेची माहिती मिळताच सवरा यांनी पीडित कुटुंबीयांची भेट घेतली. या वेळी पीडित कुटुंबाला अन्न-धान्याची मदत देत मानसिक आधार दिला. या वेळी भाजप मोखाडा तालुकाध्यक्ष संतोष चोथे, माजी तालुकाध्यक्ष विठ्ठल चोथे, आदिवासी आघाडी पालघर जिल्हाध्यक्ष मिलिंद झोले, खोडाळा उपसरपंच उमेश येलमामे, हनुमंत पादिर, प्रीतम काळे, दिशांत पाटील, भरत नडगे, ईश्वर गांगुर्डे, हरिश्चंद्र पाटील आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maratha Reservation: जरांगेंचं उपोषण सुरु असताना नाशिकमध्ये मराठा समन्वयकांची पत्रकार परिषद; SEBC आरक्षणावर ठाम!

करोडपती सासऱ्याने असं काय केलं की ३० वर्षीय सुनेनं थेट रचला कट, ६ लाखांची सुपारी देत संपवलं; धक्कादायक माहिती उघड

Nagara Road Accident : कामाच्या शोधात निघालेल्या मजुरांवर काळाचा घाला! गोंदिया-बालाघाट मार्गावर ट्रक-पीकअपच्या धडकेत 6 जण ठार, 3 वर्षीय बालकाचाही समावेश; 7 गंभीर

Marathi News Live Updates : काल केसनंद, आज खराडी... ऐश्वर्या जाधव यांच्या लावणी कार्यक्रमाला पुन्हा परवानगी नाकारली!

२८ चेंडूंत १३६ धावा! Mumbai Indians च्या फलंदाजाची हवा; १७३ धावांच्या वादळी खेळीने वेधले जगाचे लक्ष, IPL 2027 गाजवण्यासाठी सज्ज

SCROLL FOR NEXT