मुंबई

वाणगाव ते बोईसर शोभायात्रेतून प्रजासत्ताकाचा जागर

CD

वाणगाव, ता. २७ (बातमीदार) : वाणगाव-आसनगाव येथे वि. म. पाटील कृषी प्रतिष्ठान येथे ७५ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त संस्थेचे संस्थापक मधुकर पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. या वेळी गुरुकुल शिक्षण संकुलातील विद्यार्थिनींनी ध्वजाला मानवंदना देत संचलन केले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष मिलिंद पाटील, उपाध्यक्ष विकास पाटील, वित्त संचालक लूमेश देसाई, सहसचिव अक्षय पाटील, कार्यकारी संचालिका तृप्ती पाटील, प्राचार्य, प्राध्यापक, शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.

दरम्यान वाय. एन. पी. कॉलेज ऑफ फार्मसी, स्वाती पाटील बॅचलर ऑफ फॅशन डिझाईन, कृषी तंत्रनिकेतन, हॉटेल मॅनेजमेंट व लॉ कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते. राजधानी दिल्ली येथील कर्तव्यपथावरील वाहन संचालनाप्रमाणे ही यात्रा होती. सुमारे २०० किलो झेंडूच्या फुलांनी तयार केलेल्या माळा गुंफून, नाशिक ढोल, बँजो पथक, सहा बस अनेक खासगी वाहने यांसह गुरुकुल शिक्षण संकुल- वाणगाव- स्टेशन- वाणगाव नाका- बोईसर दरम्यान भव्य शोभायात्रा काढण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नालासोपारा ZP शाळेत कुकरचा स्फोट; भडका उडताच गरम खिचडी चिमुकल्यांच्या अंगावर; 2 विद्यार्थ्यांसह महिला जखमी

Kharge Rally Controversy : मल्लिकार्जुन खर्गेंच्या रॅलीनंतर 'शुद्धीकरण' वाद पेटला! राज्यभरातून 80 तक्रारींनंतर पोलिसांचं मोठं पाऊल, काय आहे नेमकं प्रकरण?

मुंबईत पीएम मोदींच्या कार्यक्रमापूर्वी सुरक्षेत मोठी त्रुटी! बंदूकधारी अन् बनावट PMO अधिकाऱ्याला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

Marathi News Live Updates : मिरवणूक बंदीकडे चाललेली पावले थांबली नाहीत तर भविष्यात उत्सवच बंद होतील - साऊंड असोसिएशन

नावही माहिती नसलेल्या खेळांचे बोगस प्रमाणपत्र! वर्ग १ आणि वर्ग २च्या नोकऱ्या मिळवल्या; दोघे अटकेत, एक हजार सर्टिफिकेट वाटल्याचा दावा

SCROLL FOR NEXT