मुंबई

Mumbai News: आमदारांवर कारवाईची हिम्मत नसेल तर गृहमंत्री फडणवीसांनी राजीनामा द्यावा: अतुल लोंढे

आमदारांच्या कृत्यावर फडणवीस यांची चुप्पी का? कारवाईची मागणी तीव्र

सकाळ वृत्तसेवा

Nitesh Rane: भाजप आमदार नीतेश राणे थेट पोलिसांना आव्हान देतात. मात्र त्याच्यावर कुठलीच कारवाई केली जात नाही. अशा आमदारांवर कारवाई करण्याची हिम्मत नसेल तर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी प्रदेश काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केली आहे.

सोलापुरच्या सभेत आमदार नीतेश राणेनी भडकाऊ भाषण दिले म्हणून पोलिसांनी गुन्हा दाखल केला; पण पुढे कारवाई काहीच झाली नाही. अकोल्यातल्या सभेतही राणेनी गरळ ओकली. ‘पोलिस माझे काहीही बिघडवू शकत नाहीत.

व्हिडिओ काढतील आणि स्वतःच्या बायकोला दाखवतील, मी येथे आलो तर तुम्हाला कायदा सुव्यवस्था सांभाळणे मुश्कील होईल.’ महिलांचा अपमान करणारी व थेट पोलिसांना आव्हान देणारी भाषा भाजप, मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना भाषा मान्य आहे का? नीतेश राणे कायद्यापेक्षा मोठे आहेत का? कारवाई करताना सरकारच्या हाताला लकवा मारला आहे का? असे प्रश्नही लोंढे यांनी उपस्थित केले.

भडकाऊ भाषण देणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. परंतु भाजप न्यायालयाच्या निर्देशाला जुमानत नाहीत. हा सत्तेचा माज आहे. कायद्यापेक्षा कोणीही मोठा नाही हे पोलिसांनी लक्षात घ्यावे. सरकार येतात व जातात परंतु पोलिस व प्रशासनाने त्यांचे कर्तव्य चोख बजावावे असेही लोंढे म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jaysingpur Heavy Rain : जयसिंगपुरात ढगफुटीसदृश्य पावसाने हाहाकार; घरांमध्ये पाणी, कोल्हापूर-सांगली महामार्गावर फूटभर पाणी

Manchar News : वादळी वाऱ्यामुळे केळी, मका व आंबा पिकांचे मोठे नुकसान; प्रशासनाला पंचनामे करण्याच्या दिलीप वळसे पाटील यांच्या सूचना

MP Supriya Sule : ‘नरेटिव्ह’ पसरवणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई का नाही?

अमरावतीत ट्विस्ट! महायुतीत बंडखोरी करणाऱ्या उमेदवाराचा अर्ज फेटाळला, आता रिंगणात चार उमेदवार, नेमकं काय घडतंय?

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूळ गावाकडे शासनाचे दुर्लक्ष; स्मारकासाठी मंजूर केलेला दोन कोटींचा निधी गेला कुठं?

SCROLL FOR NEXT