wasir pathan crime sakal
मुंबई

Mumbai News: माजी आमदार वारीस पठाण ताब्यात; आदेशाचे उल्लंघन केल्याने पोलिसांनी कारवाई

सकाळ वृत्तसेवा

AIMIM News: दहिसर पोलिसांनी सोमवारी माजी आमदार आणि ‘एमआयएम’ नेते वारिस पठाण यांना मीरा रोड परिसरात जाण्याचा प्रयत्न करताना अटक केली. अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यापूर्वी मिरा-भाईंदरमध्ये जातीय संघर्ष उसळला होता.

त्यानंतर पोलिसांनी या भागात कलम १४४ अंतर्गत जमावबंदी लागू केली होती. या पार्श्वभूमीवर वारीस पठाण मीरा रोडला जात असताना पोलिसांनी त्याना दहिसर चेक नाक्याजवळताब्यात घेतले. आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली.

मिरा रोडच्या नयानगर भागात हिंसक घटना घडल्या होत्या. त्यावेळी वाहनांची तोडफोड व दगडफेकीचे प्रकार घडले. त्यावेळी काही नेत्यांनी प्रक्षोभक वक्तव्येही केली होती. या पार्श्वभूमीवर वारीस पठाण मिरा-भाईंदर मध्ये येणार होते.()

याची माहिती मिळताच पोलिसांनी रविवारी (ता. १८) त्यांना नोटीस बजावली. कायद व सुव्यवस्था धोक्यात येणार असल्यामुळे व सध्या शाळांच्या परीक्षेचा काळ असल्यामुळे वातावरण बिघडण्याची शक्यता आहे. त्यामुळे पठाण यांनी मिरा-भाईंदरला येऊ नये, असे नोटीसमध्ये स्पष्ट करण्यात आले होते. त्यानंतरही पठाण आपल्या समर्थकांसह मिरा रोडला यायला निघाले; मात्र पोलिसांनी त्यांची वाहने दहिसर चेकनाक्याजवळ अडवली.

या वेळी पठाण व त्यांच्या समर्थकांनी निषेध करण्यासाठी रस्त्यावरच ठिय्या दिला. त्यानंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन दहिसर पोलिस ठाण्यात नेले व नंतर सोडून दिले.

‘मी १९ फेब्रुवारीला मीरा रोडला जाणार असल्याची माहिती पोलिसांना दिली होती; पण मला परवानगी देण्यात आली नाही. मी पोलिस आयुक्तांना भेटून द्वेषयुक्त भाषणे देणाऱ्या आणि जातीय तेढ निर्माण करणाऱ्यांविरुद्ध निवेदन देणार होते; पण मला अटक करण्यात आली,’ असा आरोप करत ही कारवाई संविधानानुसार आहे का, असा प्रश्नही पठाण यांनी केला आहे.

दोन व्यक्तिंविरोधात तक्रार


एआयएमआयएम मुंबई महिला सेलच्या अध्यक्षा रिजवाना खान यांनी समाज माध्यमावर कथित आक्षेपार्ह संदेश पोस्ट केल्याबद्दल दोन व्यक्तींवर कारवाई करण्यासाठी मुंबई पोलिसांकडे सोमवारी तक्रार केली होती. दोघांनी रिजवाना खान आणि त्यांचे सहकारी माजी आमदार वारिस पठाण यांच्या विरोधात आक्षेपार्ह टिप्पणी केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

लैंगिक छळ करणे आणि जातीयवादी विधाने करणे या आरोपात पोलिसांनी या दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी खान यांनी तक्रारीत केली आहे.खान यांच्या अर्जाची चौकशी करून आवश्यक असल्यास गुन्हा दाखल करणार असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Airport: पुणे विमानतळावर हवाई दलाच्या विमानाचा अपघात; लँडिंग करताना गिअर निकामी

Weekly Rashi Bhavishya Horoscope News in Marathi : कसा असेल तुमचा आठवडा..? ग्रहमान : १८ एप्रिल २०२६ ते २४ एप्रिल २०२६ - मराठी राशी भविष्य

Weekend Special Breakfast : वीकेंडला 10 मिनिटांत बनवा झटपट, हेल्दी आणि जबरदस्त टेस्टी ओट्स उत्तप्पम!

Panchang 18 April 2026 : आजचे पंचांग! शुभ मुहूर्त, राहुकाळ आणि ग्रहस्थिती जाणून घ्या एका क्लिकमध्ये

आजचे राशिभविष्य - 18 एप्रिल 2026

SCROLL FOR NEXT