kalyan rape case  sakal
मुंबई

Crime News: पूजा असल्याचे सांगत नेले घरी आणि ४२ वर्षीय नराधमाने अल्पवयीन मुलीवर..

अल्पवयीन मुलगी कल्याण पूर्वेत एका इमारतीत कुटुंबासह राहते. ती चौथीत शिकते. आरोपीही त्याच सोसायटीत राहतो

सकाळ वृत्तसेवा

Kalyan Crime: घरी पूजा असल्याचे सांगून चॉकलेट देण्याच्या बहाण्याने १० वर्षीय मुलीला घरी नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची घटना कल्याण पूर्वेत घडली आहे. याप्रकरणी पीडित मुलीच्या आईच्या तक्रारीवरून मानपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. ( physical assault on Minor Girl kalyan)

पोलिसांनी ४२ वर्षीय व्‍यक्तीवर पोक्सोसह विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.

अल्पवयीन मुलगी कल्याण पूर्वेत एका इमारतीत कुटुंबासह राहते. ती चौथीत शिकते. आरोपीही त्याच सोसायटीत राहतो.

गुरुवारी शाळेला सुट्टी असल्याने पीडित मुलगी तिची बहीण आणि मैत्रिणींसोबत इमारतीच्या आवारात दुपारी खेळत होती. तेव्‍हा आरोपीने आमच्या घरात पूजा आहे.

तुम्ही देवदर्शनासाठी या, असे सांगून त्यांना सोबत नेले. प्रसाद घेतल्यानंतर इतर मुली निघून गेल्या. मात्र, पीडित मुलीला चॉकलेटचे आमिष दाखवून त्याने थांबवून ठेवले आणि जबरदस्तीने तिला बेडरूममध्ये नेऊन तिच्याशी लैंगिक अत्याचार केला.

हा प्रकार कुठे सांगितल्यास मारण्याचीही धमकी मुलीला दिली. कशीबशी तिने आपली सुटका करून घेतली. मात्र, ती या प्रकाराने खूप घाबरली होती.

रडत-रडतच ती घरी आली. घडलेला प्रकार तिने घरच्यांना सांगितला. पालकांनी तत्काळ मानपाडा पोलिस ठाणे गाठून तक्रार दिली. त्यावरून आरोपीविरोधात गुन्हा नोंदवून त्याला अटक करण्यात आली आहे.

याप्रकरणी डोंबिवली विभागाचे सहायक पोलिस आयुक्त सुनील कुराडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस अधिक तपास करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs NZ 2nd T20: ६ चेंडूंत ११ धावा, शेवटच्या चेंडूपर्यंत थरार! तिलक-नितीशने पलटवला सामना, भारताचा न्यूझीलंडवर दणदणीत विजय!

Piyush Goyal : पावभाजीची चव रोबोट देऊ शकणार नाही; वैभव सूर्यवंशीसारखा सिक्सरही नाही! कृत्रिम बुद्धिमत्तेच्या मर्यादा आणि भारतातील संशोधनाच्या संधींवर पियुष गोयल यांची मांडणी

Pune News : औषधाच्या गोळीतून ब्लेडचे तुकडे खायला दिले; पतीस सात वर्षे सक्तमजुरीची शिक्षा, पत्नी फितूर होऊनही वैद्यकीय पुराव्यांवर निकाल

Share Market: ट्रेडिंग गुरु अवधूत साठेंला SEBIचा दणका! 546 कोटी परत करण्याचे आदेश, 67 कोटी व्याज अन् 11.5 कोटींचा दंडही भरावा लागणार

Latest Marathi News Live Update : पंतप्रधान मोदी उद्या वाराणसी दौऱ्यावर; कसा असेल कार्यक्रम?

SCROLL FOR NEXT