dead body sakal
मुंबई

Crime News: मृतदेह लवकर आणून देण्याच्या बहाण्याने भामट्याने घातला गंडा

कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील घटना |Incident at Chhatrapati Shivaji Maharaj Hospital in Kalwa

सकाळ वृत्तसेवा

Crime: बहिणीचा मृतदेह ताब्यात घेऊन देतो, असे सांगून एका भामट्याने बदलापूरमध्ये राहणाऱ्या एकाला फसविल्याची घटना कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात घडली आहे. रुग्णालयातील डॉक्टरांच्या नावाने या भामट्याने पीडिताकडून १९ हजार रुपये उकळले.

मालाड येथे मजुरी करून राहत असलेल्या पतीकडे काही दिवसांपूर्वीच त्याची पत्नी संजू कुमारी (वय ३०) मुंबई पाहण्यासाठी आली होती. मात्र, पोटदुखीच्या त्रासामुळे तिला मंगळवारी (ता. २०) कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार सुरू असतानाच तिचा मृत्यू झाला.

ही घटना समजताच तिच्या नातेवाइकांनी रुग्णालय गाठत अंतिम संस्कारासाठी रुग्णालयाकडून तिचे शव घेण्याचा प्रयत्न केला. यामध्ये मृतदेह लवकर मिळेल, असा त्यांचा प्रयत्न सुरू होता. ही बाब तेथे उपस्थित असलेल्या एका भामट्याने हेरून मृत संजू कुमारीचा भाऊ सुजित कनोजिया याला गाठत मृतदेह लवकर मिळवून देतो, असे आश्‍वासन दिले.

यावेळी त्याने सुजितला एक फोन नंबर देत त्यांच्याकडून ऑनलाइन माध्यमातून ६,७०० आणि नंतर १२,००० रुपये उकळले. काही वेळाने त्याने आणखी पैशांची मागणी केली. मात्र, या वेळी नातेवाइकांना संशय आल्याने त्यांनी रुग्णालयातील डॉक्टरांना भेटून ही घटना सांगितली. तेव्हा आपली फसवणूक झाल्याचे सुजित आणि इतरांच्या लक्षात आले.


रुग्णालयातील पोलिसांशी सुजित आणि इतर नातेवाइकांनी आणि संपर्क साधून ही घटना त्यांना सांगितली असता याबाबत तुम्हाला तुम्ही राहत असलेल्या बदलापूर पोलिसांकडे जाऊन तक्रार करावी लागेल, असा अजब सल्ला दिला, अशी माहिती सुजित कनोजिया यांनी दिली. बुधवारी (ता. २१) नातेवाइकांनी संजू कुमारी हिचा मृतदेह ताब्यात घेऊन कळवा येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले. अंत्यसंस्कार झाल्यावर तो राहत असलेल्या बदलापूर येथे याबाबतची तक्रार करणार आहे, अशी माहिती सुजित याने दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND: आकाश दीपने १० विकेट्ससह विक्रम कामगिरी बहिणीला केली समर्पित! कारणही आहे खूपच भावूक

CA Result: ‘सीए’च्या अंतिम परीक्षेत छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा देशात प्रथम; १४ हजार २४७ उमेदवार पात्र ठरले

WTC Points Table: टीम इंडियाने इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या कसोटीतील विजयासह उघडलं गुणांचं खातं! जाणून घ्या टीम कोणत्या क्रमांकावर

Pune Viral Video: इंजिनिअरिंगमध्ये 3 वेळा नापास, तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरून नदीपात्रात उडी, व्हिडिओ व्हायरल

ENG vs IND: शुभमन गिलच्या टीम इंडियाने इतिहास रचला, ५८ वर्षांत पहिल्यांदाच बर्मिंगहॅममध्ये फडकवली विजयी पताका

SCROLL FOR NEXT