Crime News esakal
मुंबई

Crime News: नाशिक-मुंबई महामार्गावरून ३ कोटींची तंबाखू जप्त

Police action: तीन कंटेनरमधून प्रतिबंधित तंबाखूची मोठी जप्ती

CD

Crime News: मुंबई-नाशिक महामार्गावर पोलिसांनी नुकताच तीन कंटेनरमधून तीन कोटी रुपयांचा प्रतिबंधित तंबाखू जप्त केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी तीनही कंटेनरचालकांना अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नाशिक-मुंबई महामार्गावरून मोठ्या प्रमाणात गुटखा व बंदी असलेल्या तंबाखूची आवक होत असल्याची माहिती भिवंडी तालुका पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी नाशिक येथील येवई गावातील शामियाना ढाब्यासमोरील रस्त्यावर उभ्या असलेल्या कंटेनरवर छापा टाकत तीन कोटी ५५ लाख १४ हजार रुपयांचा तंबाखू जप्त केला.

पोलिसांनी याप्रकरणी या कंटेनरचे चालक ताहिर सिताब खान, मोहम्मद तारिफ हबीब खान, जाहुल यासीन हक (सर्व रा. राजस्थान) यांना ताब्यात घेत त्यांच्यावर भिवंडी तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक भास्कर जाधव करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Trimbakeshwar Temple Assault : भाविकाने ड्रग्ज घेतले हे ठरविणारे तुम्ही कोण? त्र्यंबकेश्वर मारहाणीवर मंत्री गिरीश महाजन संतप्त; नेमका काय प्रकार?

रिंकू सिंगनंतर आणखी एका दिग्गज खेळाडूला पितृशोक; क्रिकेटविश्वातून श्रद्धांजली

Latest Marathi News Live Update : मुंबईत प्रभाग समितीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात

Assembly Session: भास्कर जाधव आणि कल्याणशेट्टींमध्ये वाद, विधानसभेतच एकमेकांचा बाप काढला; धक्कादायक Video समोर

Aurangzeb Crimes : सख्ख्या भावाच्या हत्येपासून पोटच्या मुलाला विष देण्यापर्यंत.! इतिहासात दडवलेत क्रूर औरंगजेबाचे 'हे' 5 काळे कारनामे

SCROLL FOR NEXT