मुंबई

भारतीय इंग्रजी सर्वात समृद्ध

CD

विरार, ता. १० (बातमीदार) : भारतीय इंग्रजीच्या जडणघडणीत अन्य भारतीय भाषांमधून आलेल्या शब्दसंपदेचा मोलाचा वाटा आहे. या शब्दसंग्रहांच्या समावेशामुळे ती अधिक समृद्ध होत गेली आहे, असे प्रतिपादन जर्मनीतील ड्रेस्डन युनिव्हर्सिटी ऑफ टेक्नॉलॉजी या विद्यापीठातील ‘इंग्रजी भाषाशास्त्र अभ्यास’च्या प्रमुख प्रा. डॉ. क्लॉडिया लांगं यांनी केले.

अण्णासाहेब वर्तक महाविद्यालयातील इंग्रजी विभागाने ‘भारतीय इंग्रजी’ या विषयावर आंतरराष्ट्रीय कार्यशाळेचे आयोजन केले होते. डॉ. क्लॉडिया यांनी ऐतिहासिक आढावा आणि तात्त्विक, तसेच संरचनात्मक मांडणी सादर केली. ब्रिटिशांच्या भारतातील आगमनानंतर इंग्रजी भाषेचा प्रचार-प्रसार देशात कसा होत गेला याचा आढावा त्यांनी घेतला. भारतीय इंग्रजीसंदर्भात केलेल्या मांडणीमध्ये त्यांनी अठराव्या शतकापासून वसाहत काळातील भारतातील भाषिक परिस्थितीचा इंग्रजी भाषेसंदर्भात आढावा घेतला.

कोणत्याही भाषेचा अभ्यास माणसाला अधिक शहाणे बनवतो आणि म्हणून भाषाशिक्षणाकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे, असे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अरविंद उबाळे यांनी प्रतिपादन केले. मुंबई विद्यापीठाच्या इंग्रजी विभागातील प्रा. डॉ. सचिन लबडे यांनी भारतीय भाषांवर इंग्रजीच्या पडणाऱ्या प्रभावाकडे तरुण पिढीने सकारात्मक पद्धतीने पाहावे असे सांगितले. जिवंत भाषाच परस्परांना प्रभावित करत असतात. भाषांमध्ये शब्द येतात-जातात, परंतु त्या माध्यमातून घडणारा परस्पर संवाद महत्त्वाचा असल्याचे त्यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rajya Sabha Election Maharashtra : राज्यसभेसाठी अर्ज दाखल करण्याच्या शेवटचा दिवशी शिंदे गटाकडून उमेदवार निश्चित, एकनाथ शिंदेंचा धक्कातंत्र

ही पाकड्यांची लायकी! T20 World Cup संघातील खेळाडूचे हॉटेलमधील महिला कर्मचारीशी गैरवर्तन; तिने आरडाओरडा केला म्हणून वाचली...

Latest Marathi News Live Update : नितीश कुमार हे काही महिन्यांसाठीच मुख्यमंत्री होतील हे मी आधीच सांगितले होते- संजय राऊत

Pune Property Prices : पुणेकरांना धक्का ! घरे होणार महाग, शहर आणि ग्रामीण भागातील रेडीरेकनर दरात तब्बल 'इतक्या' टक्क्यांची वाढ ?

Post Holi Detox: होळीनंतर शरीर डिटॉक्ससाठी करा ‘हे’ सोपे घरगुती उपाय, लगेच मिळेल आराम

SCROLL FOR NEXT