mumbai police news  sakal
मुंबई

Mumbai Police News: अभिनेत्रीचा हरवलेला मोबाईल शोधला

Mumbai Police : चित्रपटसृष्टीत प्रवेश केला असून शंभरपेक्षा अधिक चित्रपटांमध्ये भूमिका केल्या आहेत.

CD

Mumba Police News: ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाईक यांचा साकीनाका परिसरात हरवलेला मोबाईल साकीनाका पोलिसांनी दोन दिवसांत शोधून त्यांना परत केला. (Actress Uma Naik News)

उषा नाईक या मराठी चित्रपटसृष्टीतील सुप्रसिद्ध अभिनेत्री असून त्यांनी चार दशके मराठी चित्रपट सृष्टीवर अधिराज्य केले. जब्बार पटेल यांच्या ‘सामना’ या चित्रपटांमधून त्यांनी चित्रपटसृष्टीत प्रवेश केला असून शंभरपेक्षा अधिक चित्रपटांमध्ये भूमिका केल्या आहेत. (mumbai Crime News)

उषा नाईक या गुरुवारी काही कामानिमित्त साकीनाका येथील एस. जे. स्टुडिओमध्ये आल्या होत्या, त्या वेळी रिक्षामध्ये त्या मोबाईल विसरल्या. साकीनाका पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर वरिष्ठ पोलिस निरीक्षक गबाजी चिमटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक सुनील चव्हाण आणि त्यांच्या टीमने सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या आधारे रिक्षा नंबर आणि त्यानंतर मोबाईल लोकेशन काढले.(Sakinaka Police)

रिक्षाचालकाला मालाड येथून ताब्यात घेतले; परंतु माझ्याकडे मोबाईल नसल्याचे सांगत रिक्षाचालक पोलिसांची दिशाभूल करत होता. शेवटी पोलिसी खाक्या दाखवल्यावर त्याने पोलिस ठाण्यात मोबाईल जमा केला. त्यानंतर पीएसआय सुनील चव्हाण यांनी उषा नाईक यांना सदरचा मोबाईल परत केला.(Maharashtra Police News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Stock Market Today: ट्रम्प यांचे एक वक्तव्य आणि शेअर बाजार कोसळला! सेन्सेक्स 1400 अंकांनी खाली; Indigo चे शेअर्स चर्चेत

IPL 2026: प्रशिक्षक रिकी पाँटिंगनेच दिलेला वर्चस्व गाजविण्याचा सल्ला, कुपर कोनोलीनं स्पष्टच केला खुलासा

अल्लू अर्जुनच्या वाढदिवसानिमित्त चाहत्यांनी राबवला अनोखा उपक्रम ! मुलींसाठी HPV लसीकरण मोहिमेची सुरुवात

Viral status Thackeray group : ‘उद्धवरावांची उद्‌ध्वस्त सेना’ ठाकरेंच्या प्रमुख नेत्याच्या स्टेटसने चर्चा, ५ मिनीटात डिलीटही केलं

Akola News: शहरातील ३५ पाण्याच्या टाक्यांची होणार दुरुस्ती; चार झोनमध्ये पाणीपुरवठा व्यवस्थापनाचे नियोजन

SCROLL FOR NEXT