Railway News  sakal
मुंबई

Railway News: रेल्वेत नोकरीच्या आमिषाने वकिलासह पाच जणांची फसवणूक; तिघांविरुद्ध गुन्हा

Railway News: राम आणि कैलास राजपाल बाबूलाल सिंग अशी या तिघांची नावे असून ते बिहारच्या पटनाचे रहिवासी असल्याचे पोलिसांनी

CD

Andheri News: रेल्वेतील नोकरीच्या आमिषाने एका वकिलासह पाच जणांची सुमारे ३४ लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी तिघांविरुद्ध सांताक्रूझ पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. (mumbai Railway Fraud)

मोहम्मद दानिश जिशान आलम, राहुल सिंग ऊर्फ कुंदनकुमार राम आणि कैलास राजपाल बाबूलाल सिंग अशी या तिघांची नावे असून ते बिहारच्या पटनाचे रहिवासी असल्याचे पोलिसांनी सांगितले. (Railway Crime)

तक्रारदार वरळीत राहत असून वकील म्हणून काम करतात. त्यांच्या एका पोलिस मित्राने त्यांची तिन्ही आरोपींशी ओळख करून दिली होती. या तिघांनी त्यांना रेल्वेत नोकरीचे आमिष दाखवले होते. त्यांची रेल्वे मंत्र्यासह इतर अधिकाऱ्यांशी चांगली ओळख असून त्यांनी आतापर्यंत अनेकांना नोकरी मिळवून दिले असल्‍याचे सांगण्यात आले. आमिषाला बळी पडून त्यांनी दहा लाख रुपये दिले. त्यांना कोलकाता येथे प्रशिक्षणासाठी पाठवण्यात आले होते.

प्रशिक्षणानंतर त्यांना खोपोली रेल्वे स्थानकात शिपाईपदासाठी नियुक्तीपत्र देण्यात आले. मात्र, ते नियुक्तीपत्र बोगस होते. प्रशिक्षणादरम्यान त्यांची काही तरुणांशी ओळख झाली होती. त्यांनाही आरोपींनी बोगस नियुक्तीपत्र देत फसवणूक केली होती. पाच जणांकडून नोकरीसाठी सुमारे ३४ लाख रुपये घेऊन या तिघांनी फसवणूक केली होती

. हा प्रकार उघडकीस येताच त्यांचे मोहम्मद दानिशसोबत भांडण झाले होते. त्यांनी त्यांच्या पैशांची मागणी सुरू केली होती. मात्र, त्याने पैसे देण्यास नकार देत त्याची मुख्यमंत्र्यासह रेल्वे मंत्र्यांशी ओळख आहे. तुम्ही आमचे काहीही करू शकत नाही, अशी धमकी दिली.

याचदरम्यान तक्रारदार वकिलाला या टोळीकडून फसवणूक झालेले अनेक तरुण भेटले. त्याने सांताक्रूझ पोलिसांना घडलेला प्रकार सांगून तिन्ही आरोपींविरुद्ध तक्रार केली. या आरोपींविरुद्ध विविध ठिकाणी फसवणुकीचे गुन्हे दाखल आहेत.(maharashtra crime news)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Price fall before Dhanteras Diwali : धनत्रयोदशी-दिवाळीपूर्वी सोनं-चांदी स्वस्त! एकाच झटक्यात दरात मोठी घसरण; खरेदीपूर्वी जाणून घ्या ताजे भाव..!

फटाके बनवताना भीषण स्फोट! ७ जणांचा मृत्यू, एकाच कुटुंबातील ५ जणांचा समावेश

Marathi News Live Updates: नाशिकमध्ये कांद्याने भरलेला पिकअप पलटी, दुचाकीस्वार गंभीर जखमी

Maharashtra weather cyclone update : बंगालच्या उपसागरात चक्रीवादळाचा भडका; महाराष्ट्रात ऐन दिवाळीत पाऊस खोडा घालणार? हवामान विभागाचा मोठा इशारा!

Data Security : डेटा सुरक्षेत हलगर्जी भोवणार; आस्थापनांवर दंडाची टांगती तलवार; सहकारी बॅंका आणि पतसंस्थांनाही नियमावली लागू

SCROLL FOR NEXT