crime news navi mumbai  Sakal
मुंबई

Navi Mumbai Crime: पोलिसांनी रचला सापळा अन् अमली पदार्थ विक्री करणाऱ्यांना केली अटक

खारघर भागात अमली पदार्थाची विक्री करण्यासाठी आलेल्या दोन नायजेरियन नागरिकांना खारघर पोलिसांनी सापळा लावून अटक केली |Kharghar police laid a trap and arrested two Nigerian nationals who came to Kharghar area to sell drugs |

CD

Navi Mumbai Crime: खारघर भागात अमली पदार्थाची विक्री करण्यासाठी आलेल्या दोन नायजेरियन नागरिकांना खारघर पोलिसांनी सापळा लावून अटक केली.

सन्डे इजेको ओझोगू (४५) व पिटर मुनाचिमसो नॉफो (३५) अशी अटक केलेल्या दोघांची नावे असून त्यांच्याकडून तब्बल ११ लाख ४० हजार रुपये किमतीचे ११४ ग्रॅम वजनाचे मेफेड्रॉन तसेच त्यांची दुचाकी जप्त करण्यात आली.

खारघर सेक्टर २० परिसरात जलवायू विहारच्या पाठिमागे दोन नायजेरियन नागरिक अमली पदार्थ विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती खारघर पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजीव शेजवळ, पोलिस निरीक्षक (गुन्हे) अतुल आहेर व त्यांच्या पथकाने गत शुक्रवारी सायंकाळी खारघर सेक्टर-२० मध्ये सापळा लावला होता.

या वेळी त्या भागात संशयास्पदरीत्या दुचाकीवरून आलेल्या सन्डे इजेको ओझोगू व पिटर मुनाचिमसो नॉफो या दोन नायजेरियन नागरिकांना पोलिसांनी ताब्यात घेतले. पोलिसांनी त्यांची तपासणी केली असता, सन्डे इजेको ओझोगू याच्याजवळ प्लास्टिकच्या पिशवीमध्ये ५६ ग्रॅम वजनाचा पाच लाख ६० हजारांचा एमडी सापडला.

तर पिटरजवळ प्लास्टिकच्या पिशवीमध्ये ५८ ग्रॅम वजनाचा पाच लाख ८० हजारांचा एमडी आढळून आला. त्यानंतर पोलिसांनी दोघांकडे सापडलेले तब्बल ११ लाख ४० हजार रुपये किमतीचा एमडी जप्त करून दोघांनाही अटक केली.

गांजासह एकाला अटक
सायन-पनवेल मार्गालगत खारघर येथील टॅक्सी स्टँडजवळ गांजा विक्रीसाठी आलेल्या मोहम्मद रफिक मोहम्मद सईद शेख (५२) याला खारघर पोलिसांनी ताब्यात घेतले. पोलिसांनी त्याच्या रिक्षाची तपासणी केली असता, रिक्षाच्या ड्रायव्हर सीटखाली एका पिशवीमध्ये ३० हजार रुपये किमतीचा गांजा आढळून आला. त्यानंतर पोलिसांनी गांजासह त्याची रिक्षा जप्त करून मोहम्मद रफिक याला अटक केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pandharpur Yatra: कार्तिकी यात्रेवर यंदा पाणी टंचाईचे सावट; १० लाख वारकऱ्यांच्या पाण्याच्या नियोजनाचे आव्हान

पुढील 111 दिवस कसे असतील? शनीच्या नक्षत्र बदलामुळे ‘या’ राशींना संकेत!

Pune News: जुन्नरमध्ये शिक्षक मतदारांना १० हजार, पदवीधरांना ३ हजार; निवडणुकीतील ‘लक्ष्मी दर्शन’ चर्चेत

Marathi News Live Updates: पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत जयंत पाटील मैदानात

Mumbai News: विकासासाठी हिरवाईचा बळी! गोरेगाव-मुलुंड जोड मार्गासाठी १,५२४ झाडांवर कुऱ्हाड; सामाजिक संघटनांचा विरोध

SCROLL FOR NEXT