komothe Pollution sakal
मुंबई

Navi Mumbai News: प्रदूषणामुळे कामोठ्यातील नागरिक हैराण; नागरीकांच्या आरोग्यावर होतोय परिणाम

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे परिसरातील जल, वायू प्रदूषणाकडे दुर्लक्ष होत आहे| Maharashtra Pollution Control Board is ignoring water and air pollution in the area

CD


Kamothe News: प्रदूषणामुळे कामोठे परिसरात रात्रीच्या वेळी उग्र वास येत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्‍यामुळे लहान मुले, ज्येष्ठ नागरिक, गरोदर मातांना आरोग्याच्या तक्रारी उद्भवत आहेत.


महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे परिसरातील जल, वायू प्रदूषणाकडे दुर्लक्ष होत आहे. तळोजा औद्योगिक वसाहतीमधील काही रासायनिक कारखाने दूषित पाणी प्रक्रिया न करता कासाडी नदीच्या पात्रात सोडत आहेत.

दूषित पाणी कासाडी नदीच्या पात्रातून खारघर, कामोठे, कळंबोली शहरालगत असलेल्या खाडीत जाऊन मिसळत आहे. यामुळे कळंबोली, खारघर, कामोठे परिसरात जल व वायू प्रदूषणात वाढ झाली आहे.

शिवाय कारखान्याच्या धुरांड्यातून हवेत सोडण्यात येणाऱ्या धुरामुळे रात्रीच्या वेळी नागरिकांना त्रास होत आहे. लहान मुले, ज्येष्ठ नागरिकांना डोळे जळजळणे, श्वसनाचा त्रास सहन करावा लागत आहे.

गरोदर मातांच्‍या प्रकृतीवर त्‍याचे परिणाम दिसून येत आहे. कामोठे येथून खांदेश्वर व मानसरोवर रेल्वेस्थानक गाठताना नागरिकांना मास्‍क घालण्याची वेळ येत आहे. प्रदूषण मंडळ याकडे दुर्लक्ष करत असल्याने नागरिकांच्या समस्येत वाढ झाली आहे.

पनवेल महापालिकेने याकडे लक्ष देण्याची गरज असल्याचा सूर नागरिकांतून उमटत आहे. प्रदूषणामुळे खाडी किनारच्या इमारतीमध्ये राहणाऱ्या नागरिकांना घराच्या खिडक्या व दारे बंद करून बसावे लागत आहे.

कामोठे येथील एकता सामाजिक संस्थेने वाढत्या प्रदूषणाविषयी आवाज उठवला होता. यानंतर महाराष्ट्र प्रदूषण मंडळाच्या तात्पुरत्या कारवाईनंतर येथील परिस्थिती पूर्ववत झाली आहे.


खाडीकिनारी राहणारे नागरिक प्रदूषणामुळे त्रस्त झाले आहेत. पहाटे व रात्री उशिरा प्रदूषणाचे प्रमाण अधिक आहे. प्रदूषण मंडळ व पनवेल महानगरपालिका यांनी प्रदूषणास कारणीभूत ठरणारे कारखाने यांच्यावर कारवाई करण्याची गरज आहे.


- अमोल शितोळे, एकता सामाजिक संस्था.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Weekly Rashi Bhavishya Horoscope News in Marathi : कसा असेल तुमचा आठवडा..? ग्रहमान : १८ एप्रिल २०२६ ते २४ एप्रिल २०२६ - मराठी राशी भविष्य

Weekend Special Breakfast : वीकेंडला 10 मिनिटांत बनवा झटपट, हेल्दी आणि जबरदस्त टेस्टी ओट्स उत्तप्पम!

Panchang 18 April 2026 : आजचे पंचांग! शुभ मुहूर्त, राहुकाळ आणि ग्रहस्थिती जाणून घ्या एका क्लिकमध्ये

आजचे राशिभविष्य - 18 एप्रिल 2026

सृजनधारा : विनोदाची ‘समय’रेषा

SCROLL FOR NEXT