मुंबई

पोलादपूरमधून तटकरेंच्‍या प्रचाराला सुरूवात

CD

पोलादपूरमधून तटकरेंच्‍या प्रचाराला सुरुवात
पोलादपूर, ता. १० (बातमीदार) ः महायुतीचे लोकसभेचे उमेदवार सुनील तटकरे यांचा प्रचाराचा शुभारंभ पोलादपूर येथून करण्यात आला. यावेळी तटकरे यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार अनंत गीते यांच्‍यावर टीका केली.
शहरातील शिवाजीनगर येथे महायुतीच्या घेण्यात आलेला सभेत खासदार सुनील तटकरे यांनी बाटलीत भरा, सैतान, मी बुच लावतो हे शब्द उच्चारणे एका लोकसभेच्या उमेदवाराला शोभत नसल्‍याचे सांगून गीते यांचा समाचार घेतला. तसेच आमदार भरत गोगावले यांनी केलेल्या विकासकामांबाबत कौतुक केले. आमदार भरत गोगावले यांनी मतदारसंघात मागील वर्षभरात केलेल्या हजारो कोटी रुपयांच्या विकासकामांची यादी वाचून दाखविली. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या योजनांबाबत माहिती दिली. शिवाय गीते यांच्यावर सडकून टीका करत विकासासाठी तटकरे यांना भरघोस मतांनी निवडून देण्याचे आवाहन केले. यावेळी युवा सेना कोअर कमिटी सदस्य विकास गोगावले, भारतीय जनता पार्टी रायगड जिल्हा उपाध्यक्ष मनोज भागवत, माजी रायगड जिल्हा परिषद उपाध्यक्ष चंद्रकांत कळंबे यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केले.
......................

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Success Story: गर्भवती असतानाही Mains दिली; 26 दिवसांच्या बाळाला कडेवर घेऊन मुलाखत दिली अन् थेट DSP झाली!

IND vs JPN: भारत-जपानचा T20 सामना कुठे पाहता येणार? मीडिया राइट्समध्ये मोठा पेच; नेमकं काय झालं?

Marathi News Live Updates: पुण्यात प्रसिद्ध लावणी नृत्यांगणा राधा पाटीलसह मंडळाच्या अध्यक्ष, आयोजकावर गुन्हा

जरागेंच्या उपोषणाचा १० वा दिवस, प्रकृती खालावल्यानं मराठा बांधवांचा सरकारला इशारा | Jarange Patil

Ahilyanagar News: अहिल्यानगरच्या चार तालुक्यांचा होणार कायापालट; आकांक्षित तालुका योजनेत प्रत्येकी ५ कोटींचा अतिरिक्त निधी

SCROLL FOR NEXT