मुंबई

Mumbai Goa Highway: मुंबई-गोवा महामार्गावर एकामागोमाग घसरल्या ६ दुचाकी; वाचा नक्की काय घडलं

CD

Kokan News: मुंबई-गोवा महामार्गावरील साईडपट्टीवर मातीच्या भरावाचे काम सुरू आहे; पण या कामामुळे कोलाडलगतच्या पुगावनजीक एकामागोमाग एक सहा दुचाकी घसरल्याने चालकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

मुंबई-गोवा महामार्गाच्या साईडपट्टीवर मातीचा भराव टाकला जात आहे. रात्रीच्यावेळी ही कामे केली जात असल्याने दुचाकीचालकांची चांगलीच तारांबळ उडत आहे. शनिवारी रात्री (ता. १३) खांब ते कोलाडदरम्यान पुगावनजीक मातीच्या दहा गाड्या खाली करण्यात आल्या होत्या.

पण रस्त्यावरील मातीचा ढिगारा तातडीने हटवला गेला नसल्याने सहा दुचाकी एकामागोमाग घसरल्या आहेत. या दुर्घटनेत किरकोळ दुखापत झाली आहे; पण कोणत्याही प्रकारची सूचना किंवा बॅरिकेड्‌स नसल्याने मुंबईकडून कोलाडकडे जाणाऱ्या रस्त्यावर मोठ्या दुर्घटनेची शक्यता वर्तवली जात आहे.


मुंबई-गोवा महामार्गावर पळस्पे ते इंदापूर या टप्प्यातील कामे आजही अपूर्णच आहे. रस्ता काँक्रीटीकरण झाले आहे; पण साईडपट्टी झालेली नाही. त्यामुळे वाहनचालकांची फसगत होत असल्याने अपघात होत आहेत. अनेक ठिकाणी उड्डाणपूल, सेवा रस्त्यांची कामेही अपूर्ण आहेत.\


- दिनकर सानप, सामाजिक कार्यकर्ते, कोलाड

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Google वर एक स्टार रिव्ह्यू; कंपनीने महिलेवरच दाखल केला मानहानीचा दावा... काय आहे प्रकरण?

Rahul Gandhi Shirt Shoes Brand : राहुल गांधींच्या पुण्यातील कार्यक्रमानंतर शर्ट-शूजची चर्चा; ब्रँड कोणता, किंमत किती? सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

'तो' मुंबईला येतोय, पोलिसांना गुप्त माहिती मिळाली, सापळा रचला अन्...; अमली पदार्थांच्या प्रकरणात बॉलिवूड अभिनेत्याला अटक

Humanoid Robot 100m Record : चिनी रोबोटने मोडला उसैन बोल्टचा जागतिक विक्रम; १०० मीटर अंतर अवघ्या ९.३९ सेकंदांत केले पार, VIDEO VIRAL

Marathi News Live Updates : कापूरहोळमध्ये रास्ता रोको, पुणे- बेंगलुरू महामार्गावर वाहतूक कोंडी

SCROLL FOR NEXT