मुंबई

वेश्याव्यवसाय चालवणाऱ्या लॉजवर छापा

CD

नवी मुंबई, ता. २ (वार्ताहर) : नवी मुंबई पोलिसांच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने गत गुरुवारी सायंकाळी तुर्भे नाका येथील हॉटेल राज लॉजिंग ॲन्ड बोर्डिंगवर छापा मारून त्याठिकाणी वेश्या व्यवसाय चालवणाऱ्या लॉजच्या व्यवस्थापकाला ताब्यात घेतले. या कारवाईत पोलिसांनी चार महिलांची सुटका केली आहे. तुर्भे नाका येथील हॉटेल राज लॉजिंग ॲन्ड बोर्डिंगमधील व्यवस्थापक त्याच्या लॉजमध्ये येणाऱ्या ग्राहकांना तीन हजार रुपयांमध्ये महिला-मुली पुरवित असल्याची माहिती अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाला मिळाली होती. त्यानुसार वरिष्ठ पोलिस निरीक्षक पृथ्वीराज घोरपडे व त्यांच्या पथकाने गुरुवारी सायंकाळी बनावट ग्राहकाला पाठवून खात्री केली. त्यांनतर पोलिसांनी या लॉजवर छापा मारला असता, वेश्या व्यवसायासाठी चार मुली व महिला ठेवण्यात आल्याचे आढळून आले. पोलिसांनी केलेल्या चौकशीत लॉजमधील व्यवस्थापक अजय गोस्वामी व किशोर साहू व मालक राज जनार्दन गौरी या तिघांविरोधात तुर्भे एमआयडीसी पोलिस ठाण्यात पीटा कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: शेतकऱ्यांनी रोखला शिक्रापूर-पाबळ मार्ग; चासकमान कालव्याच्या अस्तरीकरणाला कडाडून विरोध, शेती आणि पाणी संकटात येईल

Latest Marathi News Live Update : पुण्यातील अनधिकृत हाऊस पार्टी प्रकरणातील सर्व तरुणांच्या पालकांना पोलीस पाठवणार नोटीस

रंगभूमी गाजवलेला गारंबीचा बापू आता रुपेरी पडद्यावर ! पोस्टरने वेधलं लक्ष

Viral Video:"‘मी का थांबावं?’ निवृत्तीच्या प्रश्नावर हरमनप्रीतचा पलटवार; चाहत्यांना आठवला धोनीचा Viral Moment"

Panhala Fort Tourism Tax : पन्हाळा गडावर पर्यटकांची मोठी कोंडी! 15 रुपये कर देऊनही 'या' एका सुविधेसाठी करावी लागतेय कसरत; पाहा काय आहे स्थिती

SCROLL FOR NEXT