मुंबई

जिल्हा रुग्णालयात महिलेच्या जिभेवर कमांडो शस्त्रक्रिया

CD

ठाणे शहर, ता. ३ (बातमीदार) : तंबाखूचे सेवन करणे एका महिलेला चांगलेच महागात पडले आहे. तंबाखूच्या सेवनामुळे तिला जिभेपासून गळ्यापर्यंतच्या भागात कर्करोगाची लागण झाली. त्यामुळे तिला कमांडोसारख्या मोठ्या शस्त्रक्रियेला सामोरे जावे लागले. सामान्य कुटुंबातील या महिलेची सुदैवाने ठाणे जिल्हा रुग्णालयात मोठी खर्चिक शस्त्रक्रिया मोफत झाली. रुग्णालयातील डॉक्टरांनी मंगळवारी (ता. २) यशस्वी शत्रक्रिया केली.

ठाण्यात राहणाऱ्या एका ५० वर्षीय महिलेला तंबाखूचे व्यसन जडले होते. दिवसातून ती चार-पाच वेळा तंबाखू खात असे. त्यामुळे तंबाखूच्या सेवनामुळे तिला कर्करोगाची लागण झाली. या महिलेची जीभ मागील अनेक दिवसांपासून जाड झाली होती. बोलताना, जेवताना तिला भरपूर त्रास होत असे. त्यामुळे त्यावरील उपचारासाठी ती ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालयात आली असता तपासणीत तिला जिभेचा कर्करोग झाल्याचे निदान झाले. त्यामुळे जिभेची शस्त्रक्रिया करण्याचे ठरले. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. कैलास पवार, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. धीरज महांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली रुग्ण महिलेच्या जिभेवरील कर्करोगाची शस्त्रक्रिया करण्यात आली, अशी माहिती दंत शल्यचिकित्सक डॉ. अर्चना पवार यांनी दिली.

रुग्ण महिलेला लागण झालेला कर्करोग जिभेपासून गळ्यापर्यंत पसरला होता. त्यामुळे काहीशी जोखमीची ही शस्त्रक्रिया ऑनको सर्जन डॉ. हितेश सिंगवी यांच्या मदतीने पार पडली. ही शस्त्रक्रिया दंत शल्यचिकित्सक डॉ. अर्चना पवार, भूलतज्ज्ञ डॉ. प्रियांका महांगडे, यांच्यासह मिलींद दौंडे, जागृती गायकर, प्रिया पगारे, स्मिता माळी, रत्नाकर ठाकरे, मदन यादव आदींनी यशस्वी केली.

डॉक्टर, कर्मचाऱ्यांप्रति कृतज्ञता
तंबाखूचे सेवन आरोग्यासाठी अपायकारक आहे, असे सांगूनदेखील अनेक जण तंबाखूची सवय सोडत नाहीत, मात्र जेव्हा कर्करोगाची लागण होते, तेव्हा संपूर्ण कुटुंबाला त्याचा त्रास सहन करावा लागतो. या प्रकरणातदेखील असेच झाले, मात्र सुदैवाने तिच्यावर मोफत शस्त्रक्रिया झाली आणि तिचा जीव वाचला. शस्त्रक्रियेतून बाहेर आल्यानंतर या महिलेला अश्रू अनावर झाले. तिने पाणावलेल्या डोळ्यांनी रुग्णालयातील सर्व डॉक्टर, कर्मचाऱ्यांप्रती कृतज्ञता व्यक्त केली.

मौखिक कर्करोगाच्या कमांडो शस्त्रक्रियेत मुख कर्करोगामुळे आलेली गळ्याकडील गाठ व जिभेचा संसर्गित भाग शस्त्रक्रियेने काढण्यात येतो. दंत विभागात येणाऱ्या प्रत्येक रुग्णांना मौखिक कर्करोगाविषयी माहिती दिली जाते. गेल्या वर्षभरात १५ हजारांपेक्षा अधिक नागरिकांचे मौखिक कर्करोगाविषयी समुपदेशन करून तपासणी करण्यात आली.
- डॉ. अर्चना पवार, दंत शल्यचिकित्सक

खासगी रुग्णालयात मौखिक कर्करोगावर उपचार घेणे सर्वांना परवडणारे नसते. त्यामुळे ठाणे जिल्ह्यातील अनेक रुग्णांना मुंबईतील टाटा रुग्णालयात धाव घ्यावी लागते; मात्र जिल्हा सामान्य रुग्णालयात मौखिक कर्करोगाच्या लहान शस्त्रक्रिया पार पडत आहेत. यासाठी खासगी कर्करोग तज्ज्ञ बोलावून शस्त्रक्रिया केल्या जातात.
- डॉ. कैलास पवार, जिल्हा शल्यचिकित्सक, ठाणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sejal Pawar Video Controversy : सेजल पवारच्या व्हिडिओवरून AIMSA च्या पदाधिकारी कनिष्का कालरांची तीव्र नाराजी, "शरिराचा आकार, 'त्या' व्हिडिओमुळे वाईट वाटलं"

Onion Procurement Scam: कांदा खरेदीत ५४ कोटींचा घोटाळा, गतवर्षीच्या खरेदी कांद्यापैकी २९ हजार ७४० टनांची तफावत; अहवालात धक्कादायक माहिती समोर..

Pune Traffic: पुणेकरांना मोठा दिलासा! १५ ते २४ जूनदरम्यान जड वाहनांना नो-एंट्री; ट्रॅफिक कोंडीवर प्रशासनाचा मोठा निर्णय

Fifa World Cup : चोरांचा इंग्लंडच्या ट्रेनिंग किटवर डल्ला... खेळाडूंचा सराव सुरू होण्यापूर्वी व्हॅनमधून सामान पळवले, फक्त एक चेंडू ठेवला...

राजघराण्यात वादातून रक्तरंजित थरार, पहिल्या पत्नीवर दुसऱ्या पत्नीने झाडली गोळी

SCROLL FOR NEXT