cyber crime esakal
मुंबई

Mumbai Cyber Crime: विम्याच्या माहितीऐवजी पाठवली पॉर्न साईटची लिंक, गोपनीय पासवर्डद्वारे ग्राहकांना पाठविले बल्क मेसेज

Insurance company email blunderअंतर्गत चौकशीदरम्यान ही लिंक बिटलिंक सॉफ्टवेअर वापरून तयार केल्याचे लक्षात आले.

CD

मुंबई, ता. २४ ः वैद्यकीय विमा पुरवणाऱ्या एका ॲपने ग्राहकांना योजनांच्या माहितीऐवजी पोर्न वेबसाईटची लिंक पाठविल्याने एकच खळबळ उडाली. त्यातील एक लघुसंदेश कंपनीच्या संचालकाच्या पत्नीलाही प्राप्त झाला. या प्रकरणी संचालकाने दिलेल्या तक्रारीच्या आधारे घाटकोपर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा नोंदवत तपास सुरू केला आहे.

संबंधित कंपनीकडून ॲपसोबतच सॉफ्टवेअर तयार करून दिले जाते. दोन्ही व्यवसायांतील ग्राहकांचे तपशील कंपनीत जतन केले आहेत. वेळोवेळी जाहिरातीसाठी किंवा नव्या योजनांची माहिती देण्यासाठी सर्व ग्राहकांना एकाच वेळी लघुसंदेश (बल्क मेसेज) पाठवले जातात.

त्यासाठी अन्य कंपनीसोबत करार करण्यात आला होता. या कंपनीने गोपनीय लॉगइन आयडी आणि पासवर्ड तयार करून दिले होते. ते कंपनीच्या दोन अधिकाऱ्यांनाच माहिती होते.
गेल्या आठवड्यात विमा ॲपच्या नावे पोर्न वेबसाईटची लिंक ग्राहकांना बल्क मेसेजद्वारे पाठवण्यात आली. त्यापैकी एक मेसेज तक्रारदार कंपनीच्या संचालकाच्या पत्नीस प्राप्त झाला.

अंतर्गत चौकशीदरम्यान ही लिंक बिटलिंक सॉफ्टवेअर वापरून तयार केल्याचे लक्षात आले. पुढे ही लिंक तयार करणाऱ्या व्यक्तीचा ईमेल आयडी प्राप्त झाला. तो कंपनी सोडलेल्या कर्मचाऱ्याचा होता, अशी माहिती घाटकोपर पोलिसांनी दिली.

कंपनीला बदमान करण्याचा प्रयत्न

संचालकाने पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत अलीकडेच नोकरी सोडून गेलेल्या अधिकाऱ्यावर संशय व्यक्त केला आहे. या अधिकाऱ्याने कंपनीने दिलेला लॅपटॉप स्वतःसोबत नेला होता. कंपनीला बदनाम करण्यासाठी त्यानेच बल्क मेसेज सेवा वापरण्यासाठी तयार करण्यात आलेल्या गोपनीय पासवर्डद्वारे हा गुन्हा केला असावा, असा संशय संचालकाने व्यक्त केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 : सामनाही गमावला अन् आता BCCIचा कारवाईचा बडगा... हार्दिक पांड्याची दुतर्फा गोची, पुन्हा असं केल्यास बंदी?

स्वरांच्या युगाचा अंत ! आशाताई भोसले अनंतात विलीन, शासकीय इतमामामात पार पडले अंत्यसंस्कार

ICC चा मोठा धमाका! टी-२० वर्ल्ड कप २०२६ साठी विक्रमी बक्षीस रकमेची घोषणा; IPL लाही टक्कर देत रकमेत १० पट वाढ

Shahajibapu Patil: तर शिवसेनेचे ५-६ आमदार निवडून येतील: शहाजीबापू पाटील, सोलापूरमध्ये तानाजी सावंत यांना लक्ष घालायला सांगा!

IPL 2026 : टीम डेव्हिडची सर्व 'मस्ती' उतरवली; मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यात अम्पायरने समाजावूनही ऐकला नाही, आता... Video

SCROLL FOR NEXT