मुंबई

यशश्री हत्याप्रकरणी लव जिहाद पोलिसांनी फेटाळला

CD

‘लव्‍ह जिहाद’ची शक्यता
पोलिसांनी फेटाळली

यशश्री शिंदे हत्या प्रकरण : आरोपीच्या शोधाकरिता चार पथके रवाना

सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. २९ ः उरण येथील यशश्री शिंदे (वय २२) हिच्या हत्येप्रकरणी ‘लव्‍ह जिहाद’ची शक्यता नवी मुंबई पोलिसांनी फेटाळून लावली आहे. या प्रकरणाच्या तपासात तशा प्रकारचे पुरावे सापडले नसल्याचे पोलिस उपायुक्त विवेक पानसरे यांनी प्रसिद्धीमाध्यमांना सांगितले. यशश्रीच्या आई-वडिलांनी केलेले आरोप आणि पोलिसांना तपासात मिळालेल्या धागेदोऱ्यांच्या आधारावर दाऊद शेख याला पकडण्यासाठी चार पथके रवाना झाल्याची माहितीही पोलिसांनी दिली.

उरण येथे राहणारी यशश्री ही २५ जुलैला बेपत्ता झाल्याची तक्रार तिचे वडील सुरेंद्र शिंदे यांनी उरण पोलिस ठाण्यात केली होती. त्यानंतर पोलिसांनी तिचा शोध सुरू केला. शनिवारी (ता. २७) पहाटे उरण रेल्वे स्थानकाच्या बाहेर झुडपात एका तरुणीचा बेवारस मृतदेह मिळाल्याची माहिती उरण पोलिसांना मिळाली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह ताब्यात घेतला. चेहरा विद्रूप केल्यामुळे ओळख पटवण्यात पोलिसांना अडचण येत होती. मात्र, यशश्रीच्या आई-वडिलांनी केलेल्या वर्णनानुसार मृतदेहाच्या अंगावरील पेहराव आणि टॅटूवरून तिची ओळख पटली. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी उरण ग्रामीण रुग्णालयात पाठवून दिल्यानंतर पुढील तपास सुरू केला आहे. पोलिसांना अद्याप शवविच्छेदन अहवाल प्राप्त झालेला नाही; पण पोलिसांनी डॉक्टरांशी केलेल्या प्राथमिक चर्चेवरून यशश्री हिच्यावर बलात्कार झालेला नसल्याचे स्पष्‍ट झाले आहे. तिच्या शरीरावर तीन वार झाले असून डोक्यावर दगडाने मारल्यासारखी गंभीर दुखापत झाली आहे. तिचा मृतदेह अधिक काळ झुडपात राहिल्यामुळे जंगली श्वापदांच्या चाव्‍यांमुळे चेहरा विद्रूप झाले असल्याचा अंदाज डॉक्टरांनी वर्तवला आहे. या प्रकरणाच्या पोलिस तपासात ‘लव्‍ह जिहाद’चा कोणतीही शक्यता आढळलेली नाही, असे स्पष्टीकरण विवेक पानसरे यांनी दिले. यशश्रीच्या आई-वडिलांनी केलेल्या आरोपांनुसार दाऊद शेख या संशयित आरोपीला पकडण्यासाठी काही पथके परराज्यात रवाना केल्याचे पानसरे यांनी सांगितले.
-----------------------------
अशी पटली ओळख
यशश्री शिंदे जेव्हा घरातून बेपत्ता झाली. तेव्हा तिने केलेल्या पेहरावाची माहिती वडील सुरेंद्र शिंदे यांनी पोलिसांना दिली. तसेच, पोलिसांना उरण रेल्वे स्थानकाबाहेर झुडपात सापडलेल्या मृतदेहावर दाऊदचे नाव असणारे टॅटू काढलेले होते. या टॅटूची यशश्रीच्या मैत्रिणीने शहानिशा केल्यानंतर तो यशश्री हिचा मृतदेह असल्याची पोलिसांची खात्री पटली, असे समजते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ayodhya Ram Mandir: रामभक्तांसाठी सर्वात मोठी खुशखबर! १३ एप्रिलपासून राम मंदिर परिसरातील सर्व १८ मंदिरांचे दर्शन सुरू; असा मिळवा 'स्पेशल पास'

Panchang 12 April 2026 : आजचे पंचांग! शुभ मुहूर्त, राहुकाल अन् दिनविशेष जाणून घ्या

आजचे राशिभविष्य - 12 एप्रिल 2026

Quick & Healthy Weekend Breakfast: रविवारच्या स्लो मॉर्निंगसाठी परफेक्ट; १० मिनिटांत बनवा हेल्दी बनाना-ओट्स पॅनकेक्स

Tamilnadu election row: रणधुमाळीत ‘जननायकन’चा ‘पब्लिक शो’

SCROLL FOR NEXT