मुंबई

मेट्रो २अ तसेच ७ची तिकिट आता १४ ॲपवर उपलब्ध

CD

मेट्रो २अ तसेच ७चे तिकीट आता १४ ॲपवर उपलब्ध
मुंबई, ता. १० : मुंबईकरांसाठी आता मेट्रो लाइन २अ आणि ७ चा प्रवास आणखी सुलभ होणार आहे. मेट्रो प्रशासनाने या मार्गिकेवर प्रवास करण्यासाठी आवश्यक असलेले क्यूआर-आधारित तिकीट तब्बल १४ पेक्षा जास्त मोबाईल ॲपद्वारे खरेदी करण्यासाठीची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. मेट्रो २अ व ७ या मार्गिकांसाठीची मोबाईल क्यूआर तिकीट मोठ्या प्रमाणात घेतली जात असून, यापुढे ओपन नेटवर्क फॉर डिजिटल कॉमर्सच्या (ओएनडीसी) माध्यमातून ही तिकीट १४ हून अधिक कन्झ्युमर-फेसिंग ॲप्लिकेशन्सवर उपलब्ध होणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते बुधवारी (ता. १०) या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली. कन्फर्म तिकीट, इझी ट्रीप, हायवे डिलाइट, झीगो ट्रेन्स, माईल्स ॲण्ड किलोमीटर, नवी युपीआय, वन तिकीट, रेड बस, रेड रेल आदी १४ ॲपवर आता मेट्रोचे तिकीट काढता येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra financial Crisis: राज्यावर कर्जाचा बोजा वाढला, प्रत्येक नागरिकावर ८५ हजार २७८ रुपयांचे कर्ज..

शेअर बाजाराला युद्धझळा! कच्चे तेल महागले, गॅसची टंचाई; रुपयाची घसरगुंडी, सोनं झालं स्वस्त

Latest Marathi News Live Update : ‘शांत पश्चिम आशिया हा भारताच्या हिताचा’

Pune Accident: बारामती जळगाव येथील राज्यमार्गावरील भीषण अपघातात ग्रामसेवकाचा मृत्यू; संतप्त ग्रामस्थांचा रास्ता रोको!

Shashikant Shinde: कंत्राटदार काय जावई आहे का?, शशिकांत शिंदे; सुरूर-पोलादपूर रस्त्याबाबत आक्रमक, महाबळेश्वर, पाचगणीचे पर्यटन अडचणीत!

SCROLL FOR NEXT