गणेशोत्सवात व्यसनमुक्तीचा जागर
पथनाट्यातून गुटखा, अमली पदार्थांविरोधात शिवसेनेचा एल्गार
पनवेल, ता. २२ (बातमीदार) : गणेशोत्सव हा केवळ धार्मिक उत्सव न राहता सामाजिक प्रबोधनाचे प्रभावी माध्यम ठरू शकतो, याचा प्रत्यय पनवेल पालिका क्षेत्रात येत आहे. गणेशोत्सवाचे औचित्य साधून गुटखा, अमली पदार्थ आणि विविध व्यसनांविरोधात शिवसेनेच्या वतीने पथनाट्याच्या माध्यमातून जनजागृती मोहीम राबवली जात आहे. शिवसेनेचे पनवेल जिल्हाप्रमुख रामदास शेवाळे यांच्या नेतृत्वाखाली कळंबोलीतून सुरू झालेली ही मोहीम आता संपूर्ण महापालिका क्षेत्रात पोहोचवली जात आहे.
गुटखा व अमली पदार्थ सेवनाने वाढणारे व्यसन आणि त्याचा तरुण पिढीवर होणारा परिणाम हा गंभीर सामाजिक प्रश्न आहे. त्यामुळे केवळ विक्रेत्यांवर कारवाई करण्याबरोबरच व्यसनाची मागणी कमी करण्यासाठी जनजागृती व प्रबोधन आवश्यक असल्याची भूमिका या मोहिमेतून मांडण्यात येत आहे. गुटखा व अमली पदार्थांविरोधात रामदास शेवाळे यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. नागरिक, लोकप्रतिनिधी, सामाजिक संस्था आणि प्रशासन यांनी एकत्रितपणे या प्रश्नावर काम करण्याची गरज यानिमित्ताने अधोरेखित करण्यात आली.
मुख्य चौक, नाक्यांवर पथनाट्य
गणेशोत्सवाच्या काळात कळंबोलीतील मुख्य चौक तसेच विविध नाक्यांवर गुटखा आणि अमली पदार्थांच्या दुष्परिणामांवर आधारित पथनाट्ये सादर करण्यात आली. व्यसनामुळे आरोग्य, कुटुंबाची आर्थिक स्थिती आणि सामाजिक जीवनावर होणारे परिणाम प्रभावीपणे मांडण्यात आले. थेट नागरिकांशी संवाद साधणाऱ्या या माध्यमातून व्यसनमुक्तीचा संदेश पोहोचविण्यात आला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.