मुंबई

वाशी-कोपरखैरणेत पहाटे प्रदूषणाची धुक्यासारखी चादर

CD

वाशी-कोपरखैरणेत पहाटे प्रदूषणाची धुक्यासारखी चादर
तीव्र दुर्गंधीने नागरिक त्रस्त; प्रदूषणाचा स्रोत शोधण्याची मागणी
तुर्भे, ता. २२ (बातमीदार) ः वाशी, जुहूगाव चौपाटी, मिनी सीशोअर, वाशी सेक्टर २८, कोपरखैरणे आणि लगतच्या परिसरात गेल्या काही दिवसांपासून पहाटेच्या वेळी धुक्यासारखे वातावरण निर्माण होत आहे, मात्र या वातावरणात येणाऱ्या तीव्र दुर्गंधीमुळे सकाळी फेरफटका मारण्यासाठी बाहेर पडणाऱ्या नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. धुक्यासारखे दिसणारे हे वातावरण हवामानातील बदल आहे की रासायनिक प्रदूषण, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
वाशीतील जुहूगाव चौपाटीवर दररोज पहाटे शेकडो नागरिक फिरण्यासाठी येतात. यामध्ये तरुणांसह ज्येष्ठ नागरिकांचाही मोठा सहभाग असतो, मात्र सध्या पहाटेच्या वेळी चौपाटी परिसरात मोठ्या प्रमाणात धुक्यासारखे वातावरण दिसून येत आहे. जवळ गेल्यानंतर या वातावरणासोबत दुर्गंधीही जाणवत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. रात्री वाशी सेक्टर २८ परिसरात अचानक तीव्र दुर्गंधीसह धुक्यासदृश वातावरण निर्माण झाल्याने नागरिकांमध्ये चिंता निर्माण झाली होती. या वातावरणात काही वेळ राहिल्यानंतर चक्कर येणे आणि अस्वस्थ वाटत असल्याच्या तक्रारीही काही नागरिकांनी केल्या.

अग्निशमन दलाची पाहणी
परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन सामाजिक कार्यकर्ते मधु शंकर यांनी अग्निशमन दलाला याबाबत माहिती दिली. माहिती मिळताच अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. प्राथमिक पाहणीत प्रदूषणाची स्थिती आढळून आल्याची माहिती असून, धूर आणि दुर्गंधी निर्माण होण्यामागे नेमके कारण काय आहे, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

एमपीबीसीने तातडीने दखल घ्यावी!
पहाटे शुद्ध हवेत फिरण्यासाठी चौपाटीवर येतो, मात्र सध्या धुक्यासारखे दिसणारे वातावरण आणि त्यातून येणाऱ्या दुर्गंधीमुळे चिंता वाटत आहे, असे नागरिक रणजित सोनावणे यांनी सांगितले. महापालिका प्रशासन आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने परिसराची तातडीने पाहणी करून प्रदूषणाचा नेमका स्रोत शोधावा आणि आवश्यक ती कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rani Mukherjee Mother Death: अभिनेत्री राणी मुखर्जीला मातृशोक! कृष्णा मुखर्जींचं निधन, कुटुंबावर दुःखाचा डोंगर

Asian Games 2026 Medal Table: भारतीय महिलांच्या 'Gold' ने पदकतालिकेत उलथापालथ, १२ व्या स्थानावर असलेलो आपण थेट पोहोचलो...

Supreme Court: एससी-एसटी कायद्यातील तरतुदींना आव्हान देणारी याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली; नेमकं प्रकरण काय?

Numerology: लहान मुलांचा हट्टीपणा अन् जन्म तारीख; 'या' ३ मूलांकांची मुले असतात प्रचंड हट्टी! पाहा काय सांगते अंकशास्त्र...

Vishakha Raut: विशाखा राऊतांना दिलासा, सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; प्रिया सरवणकरांच्या नियुक्तीला ब्रेक

SCROLL FOR NEXT