स्वच्छता मोहिमेत विद्यार्थी, लोकप्रतिनिधींचा सहभाग
खारघर, रोडपाली, तळोजा, कामोठे परिसरात श्रमदान; १५० विद्यार्थ्यांनी घेतला सहभाग
पनवेल, ता. २ (बातमीदार) : पनवेल पालिका क्षेत्रात ‘स्वच्छता ही सेवा’ अभियानांतर्गत ‘एक दिवस, एक तास, एक साथ’ या संकल्पनेनुसार गुरुवारी (ता. २) खारघर, रोडपाली, तळोजा आणि कामोठे परिसरात विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत लोकप्रतिनिधी, महापालिका अधिकारी-कर्मचारी, स्वच्छतादूत तसेच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत श्रमदान केले आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला.
‘स्वच्छतोत्सव-स्वच्छता हीच सेवा २०२६’ अंतर्गत कामोठे व खांदेश्वर रेल्वे स्थानक परिसरात सखोल स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या वेळी महापौर नितीन पाटील, उपमहापौर प्रमिला पाटील, आयुक्त मंगेश चितळे, उपायुक्त डॉ. वैभव विधाते, स्थायी समिती सभापती बबन मुकादम, प्रभाग समिती ‘क’चे सभापती रवी जोशी, नगरसेवक विकास घरत, नगरसेविका हेमलता गोवारी, नगरसेवक प्रदीप भगत, नगरसेविका शीला भगत, नगरसेवक डॉ. अरुणकुमार भगत, विभाग प्रमुख अनिल कोकरे आणि मुख्य आरोग्य निरीक्षक अरुण कांबळे उपस्थित होते.
केएलई महाविद्यालय कळंबोली, लोकनेते रामशेठ ठाकूर महाविद्यालय खारघर, एमजीएम महाविद्यालय कामोठे आणि सीकेटी महाविद्यालय खांदा कॉलनी येथील सुमारे १५० विद्यार्थ्यांनी प्रभाग समिती ‘क’च्या स्वच्छतादूतांसोबत खांदेश्वर रेल्वे स्थानकासमोरील परिसरात श्रमदान केले. या वेळी खारघर प्रभाग समितीचे सभापती मधु पाटील उपस्थित होते.
उपमहापौर प्रमिला पाटील आणि प्रभाग समिती ‘अ’चे सभापती रवींद्र भगत यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या मोहिमेत नगरसेविका मनाली ठाकूर, बायज बारगजे, नगरसेवक राजेंद्र शर्मा, भाजप नेते रवी पाटील, अमर ठाकूर, मुख्य आरोग्य निरीक्षक अरुण कांबळे, स्वच्छता निरीक्षक हरेश कांबळे, अमोल कांबळे, दिग्नेश भोईर आणि पर्यवेक्षक हर्षद पाटील यांच्यासह प्रभाग क्रमांक ७, ८, ९ आणि १० मधील स्वच्छतादूतांनी सहभाग घेतला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.