मुंबई

सेवा संकल्प अभियानांतर्गत आरोग्य शिबिरे, स्वच्छता मोहीम

CD

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १२ : ठाणे महापालिकेच्या माध्यमातून सेवा संकल्प अभियानांतर्गत शहरातील विविध प्रभाग समित्यांमध्ये नागरिक, महिला, बालके आणि विद्यार्थ्यांसाठी विविध सामाजिक व शैक्षणिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. आरोग्य तपासणी, प्लॅस्टिकमुक्ती जनजागृती, स्वच्छता मोहीम आणि विविध स्पर्धा या अभियानाच्या माध्यमातून सर्वत्र राबविण्यात येत आहे.

नौपाडा-कोपरी प्रभाग समितीच्या वतीने नागरिकांसाठी विशेष आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते. नौपाडा विभागात आयोजित केलेल्या दोन आरोग्य शिबिराचा लाभ मोठ्या प्रमाणावर नागरिकांनी घेतला. महिला व बालकांच्या आरोग्याची विशेष तपासणी करण्यासाठी स्वतंत्र आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले होते. माजीवडा-मानपाडा प्रभाग समितीअंतर्गत पर्यावरण आणि आरोग्यविषयक जनजागृतीवर विशेष भर देण्यात आला. ठाणे महापालिकेच्या या सेवा संकल्प अभियानाला स्थानिक लोकप्रतिनिधी, अधिकारी, कर्मचारी, नागरिक तसेच विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

दिवामध्ये स्वच्छता अन् वक्तृत्व स्पर्धांचा उत्साह
दिवा प्रभाग समितीच्या कार्यक्षेत्रात स्वच्छता अभियानासोबतच विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणारे विविध उपक्रम राबवण्यात आले प्रभागात सार्वत्रिक स्वच्छता मोहीम राबवण्यात आली, तर वेताळ पाडा देसाई येथील महापालिका शाळा क्र. ८७ मध्ये विशेष स्वच्छता मोहीम घेण्यात आली. याशिवाय, मुंब्रादेवी कॉलनी परिसरात लहान मुलांसाठी चित्रकला स्पर्धा पार पडली. शाळा क्र. ८७ च्या विद्यार्थ्यांनी वक्तृत्व स्पर्धेत मोठ्या संख्येने भाग घेतला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sri Lanka Politics: आधी मुलगा, आता पत्नी अडचणीत; महिंदा राजपक्षे ICU मध्ये, श्रीलंकेत सध्या काय घडतंय?

'त्या'व्हायरल व्हिडीओवर अखेर गौतमी पाटील बोलली, म्हणाली... 'लाज नाही वाटली?'

Latest Marathi News Live Update : काँग्रेस दिशाहीन, किरेन रिजिजू यांची टीका

Mumbai News: जीटीबीनगरवासीयांना भाड्याचा दिलासा! निवासींना २० तर गाळेधारकांना १० हजार रुपये

Pachod News : दावरवाडी परिसरातील सहा प्राथमिक आरोग्य उपकेंद्रेच पडलीत आजारी!

SCROLL FOR NEXT