मुंबई

बाजार समितीतील महत्त्वाची फाईल गायब;

CD

बाजार समितीतील महत्त्वाची फाइल गायब
निवृत्त कर्मचाऱ्याविरोधात गुन्हा दाखल!
जुईनगर, ता. ११ (बातमीदार) : एपीएमसीच्या प्रशासकीय इमारतीतून महत्त्वाची कागदपत्रे असलेली फाइल गायब झाल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी बाजार समितीच्या तत्कालीन सचिवांचे माजी स्वीय सहाय्यक तथा लघुलेखक म्हणून कार्यरत असलेले सेवानिवृत्त कर्मचारी यशवंत देशपांडे यांच्या विरोधात शनिवारी (ता. १०) एपीएमसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे बाजार समितीच्या प्रशासकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे. फाइल नेमकी कोणत्या विषयाशी संबंधित होती, तिच्यात कोणती कागदपत्रे होती आणि ती कुठे गेली, याचा तपास आता पोलिसांकडून करण्यात येत आहे.
यशवंत देशपांडे हे ३० जून रोजी बाजार समितीच्या सेवेतून निवृत्त झाले होते, मात्र निवृत्तीनंतरही त्यांच्याकडे कार्यालयातील काही कागदपत्रे, टॅब तसेच कपाटांच्या चाव्या असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे कार्यालयीन कागदपत्रांच्या सुरक्षिततेचा आणि त्यांच्याकडे असलेल्या साहित्याचा मुद्दा या प्रकरणाच्या निमित्ताने ऐरणीवर आला आहे. बुधवार (ता. ७) दुपारी पावणेतीनच्या सुमारास देशपांडे हे बाजार समितीच्या प्रशासकीय इमारतीतील तिसऱ्या मजल्यावरील कार्यालयात आले. त्या वेळी सचिव, सहसचिव आणि प्रशासन अधिकारी कार्यालयात उपस्थित नसल्याचे सांगण्यात येते. या वेळी त्यांनी माझी वैयक्तिक कागदपत्रे आहेत, असे सांगून कपाटातील काही कागदपत्रे आणि फाइल बाहेर काढल्याचा आरोप केला आहे. दुपारी ४च्या सुमारास देशपांडे कार्यालयातून निघून गेल्यानंतर कार्यालयातील एका महत्त्वाच्या फाइलचा शोध घेण्यात आला, मात्र शोध घेऊनही संबंधित फाइल मिळून आली नाही. त्यामुळे कार्यालयातील कागदपत्रे नेमकी कोणत्या कारणासाठी बाहेर काढण्यात आली आणि गायब झालेल्या फाइलशी त्याचा काही संबंध आहे का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. संबंधित फाइल मिळत नसल्याने देशपांडे यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती. तथापि, त्यानंतरही फाइल परत मिळाली नसल्याने बाजार समितीचे प्रभारी मुख्य सुरक्षा अधिकारी चक्रधर पवार यांनी एपीएमसी पोलिसांकडे तक्रार दाखल केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shaktipeeth Highway : शक्तीपीठ विरोधात १३ जिल्ह्यांत जमीन मोजणीला वेग?, लातूर, हिंगोलीतून विरोधक एकवटणार; कोल्हापुरातील बैठकीत नेमकं काय घडलं

Mumbai: पनवेल-कर्जत लोकल लवकरच सुरु होणार, दररोज ५० गाड्या धावणार; प्रवाशांना दिलासा मिळणार!

Congress High Drama : "कसले अध्यक्ष?"; विचारताच काँग्रेस कार्यालयात तुफान राडा, नेत्यांवर थेट चप्पल-बुटांचा मारा!

Someshwar Sugar Factory: सोमेश्वर कारखान्याच्या मतमोजणीसाठी वाहतुकीत बदल; बारामती-निरा मार्गावरील रस्ता २४ तास बंद, नेमका कसा असेल बदल?

Maharashtra Live News : मुंबईत ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात जोरदार आंदोलन

SCROLL FOR NEXT