मुंबई

चारोटी पुलाखाली रोजचीच कोंडी; नागरिक त्रस्त!

CD

चारोटी पुलाखाली रोजचीच कोंडी; नागरिक त्रस्त!

सेवा रस्त्यांवरील बेशिस्त पार्किंग ठरतेय मुख्य अडथळा

कासा, ता. ११ (बातमीदार) : मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील चारोटी येथील उड्डाणपुलाखाली दररोज संध्याकाळी आणि रात्रीच्या वेळी मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होत आहे. या कोंडीमुळे वाहनचालक, प्रवासी आणि स्थानिक नागरिक त्रस्त झाले असून, अनेकांना दररोज या कोंडीत अडकून राहावे लागत आहे. या ठिकाणी कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात यावी, अशी मागणी आता जोर धरत आहे.
चारोटी येथे मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरून डहाणू-नाशिक राज्य महामार्ग जातो. या परिसरात सुरू असलेल्या विविध प्रकल्पांमुळे अवजड वाहनांची वर्दळ वाढली आहे. त्यातच शारदीय नवरात्रोत्सव सुरू असल्याने डहाणूतील महालक्ष्मी मंदिरात दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांची आणि पर्यटकांची संख्या वाढली आहे. शनिवार-रविवार तसेच सुट्ट्यांच्या दिवशी या मार्गावरील वाहतुकीचा ताण अधिक वाढत असल्याने कोंडीची समस्या गंभीर होत आहे.

कोंडीची मुख्य कारणे
चारोटी येथील एशियन पेट्रोलपंपावर सीएनजी आणि इंधन भरण्यासाठी वाहनांच्या रांगा लागतात. मुंबईच्या दिशेने जाणारी वाहने आणि डहाणू-जव्हार राज्य महामार्गावरून ये-जा करणाऱ्या वाहनांची एकाच ठिकाणी गर्दी होत असल्याने वाहतुकीचा खोळंबा होतो. उड्डाणपुलाखालील मर्यादित उंचीमुळे काही मोठ्या वाहनांच्या मार्गक्रमणात अडथळे निर्माण होतात. तसेच उड्डाणपुलाच्या दोन्ही बाजूंच्या सेवा रस्त्यांवर (सर्व्हिस रोड) बेशिस्तपणे उभी केली जाणारी वाहनेही कोंडीत भर घालत आहेत.या कोंडीमुळे रिक्षाचालक, दुचाकीस्वार आणि खासगी वाहनचालकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रभावी नियंत्रण दिसून येत नसल्याची तक्रार नागरिकांकडून केली जात आहे. कोंडीदरम्यान वाहनचालकांमध्ये वादावादीचे प्रसंगही घडत असल्याचे सांगण्यात येते.

प्रशासनाची भूमिका
‘‘चारोटी उड्डाणपुलाखालील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी वाहतूक शाखेकडून तातडीने आवश्यक ती कारवाई करण्यात येईल व वाहतूक व्यवस्था पूर्ववत केली जाईल.’’
- ए. जाधव (अधिकारी, महामार्ग चारोटी वाहतूक शाखा)

वाहनचालकांचा मनस्ताप
‘‘उड्डाणपुलाखाली दररोज वाहतूक कोंडी होत असल्याने आम्हाला मोठा त्रास सहन करावा लागतो. अनेकदा तासभर ते दीड तास वाहनांच्या रांगेत थांबावे लागते. शासनाने यावर तातडीने उपाययोजना करून वाहनचालकांची या रोजच्या त्रासातून मुक्तता करावी.’’
- राकेश शिंदे, वाहनचालक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

वयाच्या २६ व्या वर्षी ७५ लाखांची संपत्ती! १८ हजारांच्या पगारापासून सुरू झाला प्रवास

Election Commission of India : ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीदरम्यान निवडणूक आयोगात मोठे फेरबदल; मतदारयादी विभागातील अधिकाऱ्यांची बदली

वयाच्या ६० व्या वर्षीही मिलिंद सोमण अनवाणी धावतात! पायांच्या स्नायूंना होतात 'हे' फायदे; पण ही काळजी घ्या

सायन रुग्णालयात डॉक्टरने जीवन संपवलं; स्वत:लाच सलाईन लावत ॲनस्थेशियाचा ओव्हरडोस घेतला, बाथरूममध्ये मृतदेह आढळल्याने खळबळ

Maharashtra Live News : सीजेपी आंदोलकांची पुण्यात धरपकड

SCROLL FOR NEXT