मुंबई

२४ वर्षांनी जुळली नात्यांची वीण

CD

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १२ : बालपणी कुटुंबापासून दुरावलेल्या बहिणीचा तब्बल २४ वर्षांचा दुरावा दूर करण्यासाठी ठाणे शहर पोलिसांनी मोलाची भूमिका बजावली. बाल संरक्षण कक्षाला ऑपरेशन ‘शोध-५’ अंतर्गत भारती कदम यांचा त्यांच्या भावंडांशी तब्बल २४ वर्षांनंतर पुनर्संपर्क घडवून आणण्यात यश आले. विशेष म्हणजे, भारती यांनी कुटुंबाचा शोध घेण्यासाठी संपर्क साधल्यानंतर अवघ्या सहा तासांत पोलिसांनी त्यांच्या भावंडांचा ठावठिकाणा शोधून काढला. २००२च्या मतदार यादीतील नोंदी या शोधात महत्त्वाचा दुवा ठरल्या.

भारती या सध्या जान्हवी वैभव झांबरे या नावाने ओळखल्या जातात. त्यांचे लग्न झाले असून, त्या सोलापूर येथे राहतात. त्यांना एक मुलगी आणि एक मुलगा आहे. आयुष्याचा प्रवास पुढे सुरू असतानाही बालपणी दुरावलेल्या आई-वडिलांची आणि भावंडांची आठवण त्यांच्या मनात कायम होती. आपल्या कुटुंबाचा शोध घेऊन त्यांच्याशी पुन्हा संपर्क साधावा, या इच्छेने त्या गेल्या आठ वर्षांपासून प्रयत्न करत होत्या. अखेर ठाणे पोलिसांच्या मदतीने त्यांची ही प्रतीक्षा संपण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल पडले.

२००२ मध्ये भारती लहान असताना नवी मुंबई येथे मामाकडे गेल्या होत्या. त्या वेळी त्या कुटुंबापासून हरवल्या. त्यानंतर बेलापूर पोलिसांना त्या आढळल्या; मात्र कुटुंबीयांचा शोध न लागल्याने त्यांना बालगृहात ठेवण्यात आले. पुढे त्यांचे लग्न झाले. सध्या त्या जान्हवी वैभव झांबरे या नावाने सोलापूर येथे राहतात. त्यांना एक मुलगी आणि एक मुलगा आहे, मात्र बालपणी दुरावलेल्या कुटुंबाला पुन्हा भेटण्याची ओढ त्यांच्या मनात कायम होती. गेल्या आठ वर्षांपासून त्या कुटुंबाचा शोध घेत होत्या.

दुसरीकडे, त्यांचे भाऊ विजय कदम यांनीही बहिणीचा शोध घेण्याचा प्रयत्न केला होता. दिल्ली आणि हरियाना परिसरात शोध घेऊनही त्यांना यश आले नव्हते. अखेर ८ ऑक्टोबरला भारती यांनी ठाणे पोलिसांच्या बाल संरक्षण कक्षाशी संपर्क साधला. पोलिसांनी जुन्या अभिलेखांची तपासणी करत नवी मुंबई पोलिस आणि सीबीडी बेलापूर मिसिंग सेलशी समन्वय साधला. २००२च्या मतदार यादीत भावाच्या नावाशी संबंधित नोंद सापडल्यानंतर कुटुंबीयांपर्यंत पोहोचण्याचा मार्ग मोकळा झाला. या मोहिमेत बाल संरक्षण कक्षातील पोलिस उपनिरीक्षक वासंती शिंदे, पोलिस हवालदार तानाजी गायकवाड, महिला पोलिस नाईक तेजश्री शिरसाठ आणि महिला पोलिस शिपाई सुवर्णा यादव यांनी विशेष परिश्रम घेतले.

पोलिसांच्या कर्तव्याला माणुसकीची जोड
हरवलेल्या व्यक्तींचा शोध घेणे आणि त्यांना त्यांच्या कुटुंबीयांशी पुन्हा जोडणे, हे पोलिसांच्या कामातील संवेदनशील अंग आहे. ऑपरेशन ‘शोध-५’ अंतर्गत ठाणे शहर पोलिसांच्या बाल संरक्षण कक्षाने केलेली ही कामगिरी जुन्या अभिलेखांची पडताळणी, तांत्रिक माहितीचा वापर आणि विविध यंत्रणांमधील समन्वयाचे महत्त्व अधोरेखित करते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sri Lanka Politics: आधी मुलगा, आता पत्नी अडचणीत; महिंदा राजपक्षे ICU मध्ये, श्रीलंकेत सध्या काय घडतंय?

'त्या'व्हायरल व्हिडीओवर अखेर गौतमी पाटील बोलली, म्हणाली... 'लाज नाही वाटली?'

Latest Marathi News Live Update : काँग्रेस दिशाहीन, किरेन रिजिजू यांची टीका

Mumbai News: जीटीबीनगरवासीयांना भाड्याचा दिलासा! निवासींना २० तर गाळेधारकांना १० हजार रुपये

Pachod News : दावरवाडी परिसरातील सहा प्राथमिक आरोग्य उपकेंद्रेच पडलीत आजारी!

SCROLL FOR NEXT