वाचनातून घडते व्यक्तिमत्त्व
मातृभाषेतील साहित्य विचारांना देते नवी दिशा; लीना जंगम यांचे प्रतिपादन
माणगाव, ता. १२ (बातमीदार) : वाचन हा उत्तम छंद असून, प्रत्येकाने तो जोपासावा. वाचनामुळे ज्ञानात भर पडते, विचार करण्याची क्षमता विकसित होते आणि जीवनाला नवी दिशा मिळते. मातृभाषेतील साहित्य वाचणे आणि समजून घेणे सोपे असल्याने विद्यार्थ्यांनी वाचनाची सवय लावून घ्यावी, असे प्रतिपादन कांचनगंगा शिक्षण संस्थेच्या कार्याध्यक्ष लीना जंगम यांनी केले.
माणगाव येथील जंगम हायस्कूलमध्ये ‘वाचन संस्कृतीचे महत्त्व’ या विषयावर आयोजित मार्गदर्शनपर कार्यक्रमात त्या बोलत होत्या. या वेळी शालेय समितीचे सदस्य लक्ष्मण जंगम, दर्शना डांगोरे, उषा पाटील यांच्यासह शिक्षक उपस्थित होते.
वाचनामुळे व्यक्तिमत्त्वाचा अंतर्बाह्य विकास होतो. वाणीवर संस्कार होतात, भाषा शुद्ध होते आणि विचारांची देवाणघेवाण सुलभ होते. पुस्तकांच्या माध्यमातून नवीन विषयांची ओळख होते, कल्पनाशक्तीला चालना मिळते आणि सर्जनशीलता विकसित होते. वाचनामुळे योग्य-अयोग्य यातील फरक समजतो, आत्मपरीक्षणाची सवय लागते आणि व्यक्ती अधिक समृद्ध होते. ‘वाचाल तर वाचाल’ ही म्हण वाचनाचे महत्त्व अधोरेखित करते. पुस्तकांच्या सहवासातून ज्ञानासोबतच एक नवा मित्रही मिळतो, असे जंगम यांनी सांगितले.
फोटो ओळ : विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना लीना जंगम.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.