ज्ञानेशकुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी वाशीत मनसेची स्वाक्षरी मोहीम
हजारो नागरिकांसह तरुणाई व महिला वर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद
कोपरखैरणे, ता. १२ (बातमीदार) : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी मनसेच्या वतीने सोमवारी (ता. १२) वाशी रेल्वे स्थानकाबाहेर स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेला नागरिक, महिला आणि विशेषतः तरुणांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. हजारो नागरिकांनी प्रत्यक्ष स्वाक्षरी करून निवडणूक आयोगाच्या कारभाराविरोधात आपला तीव्र रोष व्यक्त केला.
मनसेचे प्रवक्ते तथा नवी मुंबई शहराध्यक्ष गजानन काळे यांच्या नेतृत्वाखाली पार पडलेल्या या मोहिमेत कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला. वन, टू, थ्री, फोर... ज्ञानेशकुमार वोट चोर’, ‘ज्ञानेशकुमार यांचं करायचं काय? खाली डोकं वर पाय ... आणि गद्दार ज्ञानेश, राजीनामा द्या ...अशा घोषणांद्वारे आंदोलकांनी आपला संताप व्यक्त केला. तिरंगा ध्वज फडकावत इन्कलाब झिंदाबाद आणि भारत माता की जय, अशा घोषणाही देण्यात आल्या. मनसे कार्यकर्त्यांनी परिधान केलेले ‘गद्दार ज्ञानेश, राजीनामा द्या’ असा संदेश असलेले टी-शर्ट नागरिकांचे लक्ष वेधून घेत होते. स्वाक्षरी मोहिमेत सहभागी झालेल्या अनेक नागरिकांनी केंद्र सरकार आणि मुख्य निवडणूक आयुक्तांच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली. निवडणूक प्रक्रियेबाबत उपस्थित करण्यात येणाऱ्या प्रश्नांची दखल घेऊन संबंधितांनी जबाबदारी स्वीकारावी, अशी मागणीही या वेळी करण्यात आली. यानंतर ही स्वाक्षरी मोहीम आंदोलन वाशीच्या के बी पी कॉलेज बाहेर करण्यात आले.
या मोहिमेत उपशहराध्यक्ष नीलेश बाणखेले, सविनय म्हात्रे, विनोद पार्टे, शहर सचिव विलास घोणे, सचिन कदम, शहर सहसचिव तथा नगरसेवक अभिजित देसाई, मनसे महिला सेनेच्या शहराध्यक्ष डॉ. आरती धुमाळ, मनसे वाहतूक सेनेचे सरचिटणीस नितीन खानविलकर, विद्यार्थी सेनेचे शहराध्यक्ष संदेश डोंगरे आदी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.