मुंबई

डेटा सेंटरच्या अभ्यास समितीवर प्रश्न

CD

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १४ : ठाण्यातील डेटा सेंटरमुळे वीज, पाणी आणि स्थानिक नागरी सुविधांवर होणाऱ्या परिणामांचा अभ्यास करण्यासाठी स्थापन केलेल्या राज्यस्तरीय समितीत संबंधित कंपन्यांच्याच प्रतिनिधींना स्थान दिल्याने समितीच्या निष्पक्षतेवर प्रश्न उपस्थित झाले आहेत. ॲमेझॉन आणि योट्टा या कंपन्यांच्या प्रतिनिधींच्या नियुक्तीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरदचंद्र पवार गटाचे जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांनी आक्षेप घेतला आहे. चोराच्या हाती तिजोरीच्या चाव्या दिल्यासारखा हा प्रकार आहे, अशी टीका त्यांनी केली आहे.

डेटा सेंटरच्या सर्वंकष अभ्यासासाठी राज्य सरकारने राष्ट्रीय अणुऊर्जा आयोगाचे माजी अध्यक्ष डॉ. अनिल काकोडकर यांच्या अध्यक्षतेखाली १६ सदस्यीय उच्चस्तरीय समिती स्थापन केली आहे. काकोडकर यांची अध्यक्षपदी नियुक्ती करण्याच्या निर्णयाचे प्रधान यांनी स्वागत केले. तसेच ऊर्जा, जलसंपदा, उद्योग आणि पर्यावरण विभागांचे प्रधान सचिव, ‘नीरी’चे संचालक डॉ. एस. वेंकट मोहन आणि आयआयटी मुंबईचे प्रा. एम. व्ही. रणे यांचा समितीतील समावेशही योग्य असल्याचे त्यांनी म्हटले. मात्र ॲमेझॉन वेब सर्व्हिसेसचे प्रसाद कल्याणरामण आणि योट्टा डेटा सर्व्हिसेसचे श्रीनिवास पी. यांच्या नियुक्तीवर त्यांनी आक्षेप नोंदवला आहे.

ज्या कंपन्यांच्या प्रकल्पांचा अभ्यास करायचा आहे, त्याच कंपन्यांचे प्रतिनिधी समितीत असल्याने अहवालाच्या निष्पक्षतेबाबत शंका निर्माण होत असल्याचे प्रधान यांनी म्हटले आहे. संबंधित कंपन्यांचे प्रतिनिधी स्वतःच्या हिताला पूरक अहवाल तयार करण्याचा प्रयत्न करू शकतात, असा संशय ही व्यक्त करण्यात आला आहे.

समिती रचनेचा पुनर्विचार करा
समितीच्या रचनेचा पुनर्विचार करावा, अशी भूमिका प्रधान यांनी मांडली आहे. शहराच्या संसाधनांवरील ताण आणि नागरिकांवरील संभाव्य परिणामांचा निष्पक्ष अभ्यास व्हावा, यासाठी समितीत स्वतंत्र तज्ज्ञांना प्राधान्य देणे आवश्यक असल्याचेही त्यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

W,W,W,W,W ! दक्षिण आफ्रिकन गोलंदाजाचा कहर, ट्वेंटी-२०त एकाच षटकात सलग पाच विकेट्स VIDEO

Pune News : कामकाजात दुर्लक्ष भोवले; आरोग्‍य विभागाच्‍या दोन सहाय्यक संचालकांचे निलंबन

Maharashtra Live News : पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघासाठी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत पुण्यात महत्त्वाची बैठक

Sugarcane Rate Agitation : ऊसदराच्या आंदोलनामुळे कोगनोळी टोलनाक्यावरील वाहतूक ठप्प; पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन

'या गोजिरवाण्या घरात' मधली दीक्षा आठवते? सध्या काय करते? सांगितलं छोट्या पडद्यावर न दिसण्याचं कारण

SCROLL FOR NEXT